नवी दिल्ली : क्रिकेटमध्ये हेलिकॉप्टर शॉट म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे महेंद्रसिंग धोनी. टीम इंडियाचा माजी कॅप्टन असलेल्या महेंद्रसिंग धोनी याचा हेलिकॉप्टर शॉट पाहण्यासाठी क्रिकेटचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


हेलिकॉप्टर शॉटमध्ये प्रचंड ताकद, टेक्निक आणि टायमिंगची आवश्यकता असते. अनेक क्रिकेटर्सने धोनीप्रमाणे हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. ज्यामध्ये वीरेंद्र सेहवाग, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि ब्रेट ली यांचा समावेश आहे.


ऑस्ट्रेलियाविरोधात टीम इंडियाने पहिली टी-२० क्रिकेट मॅच धोनीच्या घरच्या मैदानात खेळली गेली. यावेळी सेहवाग, लक्ष्मण आणि ब्रेट ली यांनी धोनीचा हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. हा शॉट पाहताना एकदम सोपा वाटतो मात्र, मैदानात हा शॉट खेळणं खुपच कठीण आहे.


हा व्हिडिओ रांचीमधील मैदानातील आहे. या ठिकाणी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिली टी-२० मॅच खेळण्यात आली. त्यापूर्वी महेंद्रसिंग धोनीचा हेलिकॉप्टर शॉट खेळण्यासाठी मैदानात वीरेंद्र सेहवाग आला मात्र, त्याला खेळण्यात अपयश आलं.



सेहवागनंतर लक्ष्मण मैदानात उतरला आणि त्याने प्रयत्न केला. लक्ष्मणने खूपच चांगला शॉट खेळला मात्र, त्यालाही हेलिकॉप्टर शॉट खेळण्यात अपयश आलं. त्यानंतर ब्रेट ली आणि डीन जॉन्स यांनी प्रयत्न केला मात्र, त्यांनाही हा शॉट खेळता आला नाही.