पांड्यासाठी दमदार शतकानंतर वीरूकडून हटके ट्विट
आपल्या ट्विट करण्याच्या वेगळ्या शैलीसाठी टीम इंडियाचा माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवाग हा नेहमीच चर्चेत असतो. टीम इंडियातील खेळाडू असो वा मित्र असोत सर्वांसाठी वीरू आपल्या स्टाईलने ट्विट करून सर्वांनाच आनंद देतो.
नवी दिल्ली : आपल्या ट्विट करण्याच्या वेगळ्या शैलीसाठी टीम इंडियाचा माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवाग हा नेहमीच चर्चेत असतो. टीम इंडियातील खेळाडू असो वा मित्र असोत सर्वांसाठी वीरू आपल्या स्टाईलने ट्विट करून सर्वांनाच आनंद देतो.
आता वीरूने टीम इंडियाचा धमाकेदार खेळाडू हार्दिक पांड्याच्या खास कामगिरीवर ट्विट केले आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत हार्दिक पांड्यानं ठोकलेल्या पहिल्यावहिल्या दमदार शतकानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मग अशात वीरू तरी कसा मागे राहणार ? वीरून पांड्या ट्विट करून अभिनंदन केलं आहे. वीरूने 'वेलडन मेरे कुंगफू पांड्या'... अशा शब्दांत वीरूनं पांड्याचं अभिनंदन केलं आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत रविवारी पांड्यानं शतक झळकावल्यानंतर वीरूनं त्याला पुन्हा शाबासकी दिली. ''व्वा! काय जबरदस्त शतक ठोकलंय हार्दिक पंड्यानं... शाब्बास माझ्या कुंगफू पांड्या... मजा आली...'' सेहवागचं हे ट्विट हजारो लोकांनी रिट्विट केलं आहे.