मेरठ : टीम इंडियाचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवाग याने एक खळबळजनक वक्तव्य केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेरठ येथील एका कार्यक्रमात सेहवाग म्हणाला की, कर्णधार भलेही टीमचा सर्वेसर्वा असतो, पण अनेक बाबतीत त्याची भूमिका केवळ सल्ला देण्याची असते. याच कारणाने विराट कोहलीच्या समर्थनानंतरही तो टीम इंडियाचा कोच होऊ शकला नाही.


अनिल कुंबळे याने मुख्य कोच पद सोडल्यानंतर सेहवागही या पदासाठी दावेदार मानला जात होता. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि वीवीएस लक्ष्मण यांच्या समितीने रवि शास्त्री यांच्या नावावर मोहोर लावली. सेहवाग म्हणाला की, कर्णधाराचा टीमशी निगडीत वेगवेगळ्या निर्णयांवर प्रभाव असतो. पण प्रत्येकवेळी त्याचा निर्णय अंतिम असू शकत नाही’.


सेहवाग म्हणाला की, विराट कोहलीला असे वाटत होते की, मी टीम इंडियाचा कोच बनावं. जेव्हा कोहली माझ्याशी बोलला तेव्हाच मी या पदासाठी अर्ज केला होता. पण मी कोच बनलो नाही. अशात तुम्ही असं कसं म्हणू शकता की, प्रत्येक निर्णयात कर्णधाराचा शब्द शेवटचा ठरतो. 


सेहवागबाबत बोललं जातं की, जेव्हा तो क्रिजवर उतरत होता तेव्हा तो हा विचार नाही करायचा की समोर कोण गोलंदाज आहे. पण सेहवागने हे मान्य केले की, त्याला श्रीलंकेचा स्पिनर मुथय्या मुरलीधरनच्या बॉलिंगवर खेळणे अनेकदा अडचण गेली.