रेसलर्स आंदोलनाला बसले तेव्हा कुठे होतास? ट्रोलरने असा प्रश्न विचारल्यावर सेहवाग...
Virendra Sehwag Replied Trollers: स्पर्धेत टीम इंडिया ऐवजी भारत या नावाने मैदानात उतरावं असं सेहवागने ट्विट करत मागणी केली आहे. यावरुन काहीजण सेहवागला पाठींबा देत आहेत. तर काहीजण त्याला विरोध करत आहेत.
Virendra Sehwag Replied Trollers: सध्या देशात भारत की इंडिया या नावावरुन वाद सुरु आहेत. इंडियाऐवजी आता भारत असा उल्लेख करावा असा मतप्रवाह सुरु आहे. अनेक सेलिब्रिटी या मतप्रवाहाला पाठींबा देत आहेत. यात माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवागनेदेखील उडी घेतली होती. आगामी वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचं नाव बदललं जावं असं सेहवगाने म्हटलं आहे. स्पर्धेत टीम इंडिया ऐवजी भारत या नावाने मैदानात उतरावं असं सेहवागने ट्विट करत मागणी केली आहे. यावरुन काहीजण सेहवागला पाठींबा देत आहेत. तर काहीजण त्याला विरोध करत आहेत.
सेहवागला विरोध करणाऱ्यापैंकी अनेकजण त्याला भविष्यात भाजपची खासदरकी मिळणार असल्याचे म्हणत आहेत. तर काहीजणांनी जेव्हा रेसलर आंदोलन करत होते, ते कुठे होतास? त्यावर का बोलला नाहीस? असा प्रश्न सेहवागला विचारला. यावर सेहवागने उत्तर दिले आहे.
सेहवाहगने आपल्या जुन्या ट्विटचा स्क्रिनशॉट अपलोड केला. त्यावर त्याने आंदोलन करणाऱ्या रेसलर्सबद्दल ट्विट केले होते. आपल्या देशाचे चॅम्पियन्स ज्यांनी आपल्या देशाचे नाव रोशन केले, झेंडा फडकावला, आपल्याला इतका आनंद दिला, त्यांना आज रस्त्यावर यावे लागले आहे, हे खूप दु:खद आहे. हे खूप संवेदनशील प्रकरण असून याचा निष्पक्ष तपास व्हायला हवा आणि रेसलर्सना न्याय मिळायला हवा, असे ट्विट सेहवागने केले होते.
सेहवागने संबंधित ट्रोलर्सला या ट्विटचा रिप्लाय केला. 'थोडी नजर वाढव', असा सोबत सल्लाही दिला.
मला नेहमीच विश्वास आहे की नाव असे असावे की ते आपल्यामध्ये अभिमान जागृत करेल. आपण भारतीय आहोत आणि इंडिया हे नाव ब्रिटिशांनी दिलं आहे. त्यामुळे इंडियाचं नाव बदललं गेलं पाहिजे, अशी मागणी सेहवागने काही दिवसांपुर्वी जय शाह यांना केली होती.
'भारत हे खरं नाव आहे, पण...', India नाव बदलण्यावरुन गावसकर स्पष्टच बोलले; 'तरच भारत संघ म्हणायचं'
भाजपचे खासदार नरेश बन्सल यांनी काही दिवसांपूर्वी संविधानात इंडियाऐवजी (India) भारत (Bharat) नाव करण्याची मागणी राज्यसभेत केली होती.. त्यानंतर काहीच दिवसात इंडियाऐवजी भारत असा उल्लेख राष्ट्रपतींच्या निमंत्रणपत्रिकेवर करण्यात आल्यानं राजकारण तापलंय. तर सरसंघचालक मोहन भागवतांनीही यापूर्वीच इंडियाऐवजी भारत असा उल्लेख झाला पाहिजे अशी भूमिका मांडली होती. त्यामुळे भारत नाव करण्याची मागणी पुन्हा जोर धरु लागलीय..