Virender Sehwag 100 Centuries Record: टीम इंडियाचा (Team India) माजी खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) जगातील महान खेळाडूंपैकी एक. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (Internatinal Cricket) सर्वाधिक रन्स, सर्वाधिक शतकं अजूनही सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत तब्बल 100 शतकं केली. सचिन तेंडुलकरचा हा विक्रम अजूनही अबाधित आहे. सचिन तेंडुलकरचा हा विक्रम मोडण्याची धमक एका खेळाडूमध्ये आहे आणि त्या खेळाडूचं नाव भारताचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag)सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा खेळाडू मोडू शकतो सचिनचा रेकॉर्ड
सचिन तेंडुलकरच्या शंभर शतक्यांचा विक्रम मोडण्याबाबत वीरेंद्र सेहवागने भविष्यवाणी केली आहे. वीरेंद्र सेहवागने केलेल्या दाव्यानुसार नुकताच फॉर्ममध्ये परतलेला विराट कोहली (Virat Kohli) हा विक्रम मोडू शकतो. एशिया कप स्पर्धेत विराट कोहलीने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील 71 वं शतक पूर्ण केलं.


अफगाणिस्तानविरुद्ध केलेल्या शतकामुळे केवळ मीच नाही तर देशभरातील क्रिकेट चाहते खुश असल्याचं सेहवागने म्हटलंय. विराटला त्याच्या लौकिकाला साजेसा खेळ पाहण्यासाठी क्रिकेट चाहते आतुर होते. आता विराट कोहली पुन्हा त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परतला आहे. त्याने आता 71 वं शतक केलंय, असाच खेळत राहिला तर तो 100 शतकांपासून दूर नाही, असं सेहवागने म्हटलंय.


1020 दिवसांनंतर शतक
एशिया कप 2022 स्पर्धेतून टीम इंडिया बाहेर पडली असली तरी विराट कोहली या स्पर्धेत शानदार फॉर्ममध्ये दिसला. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने आक्रमक फलंदाजी करत शतकी खेळी केली. 2019 नंतर म्हणजे तब्बल 1020 दिवसांनंतर विराट कोहलीने शतक केलं. हे त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतलं 71 वं शतकं होतं. सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिक शतक करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे.