नवी दिल्ली : २०११ च्या वर्ल्डकपमध्ये अंतिम सामन्यात जोरदार सिक्सर मारुन भारताला वर्ल्डकप जिंकून देणारा क्रिकेटर महेंद्र सिंग धोनी पुन्हा एकदा आकर्षणाचे केंद्र बनला आहे. याचे कारण होते लेफ्टिनेंट कर्नल सेनेच्या वर्दीत धोनीने पद्म भूषण पुरस्कार स्वीकार केला. याची खासियत म्हणजे वर्ल्डकप जिंकल्यानंतर बरोबर ७ वर्षांनी त्याच दिवशी धोनीला या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारताने २ एप्रिल २०११ मध्ये महेंद्र सिंग धोनीच्या कॅप्टनशीपखाली तब्बल २८ वर्षांनंतर दुसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकला. महेंद्र सिंग धोनीला लेफ्टिनेंट कर्नल ही सन्मानपूर्वक उपाधी देण्यात आली आहे. ही उपाधी मिळवणारा कपिल देव यांच्यानंतर धोनी हा दुसरा क्रिकेटर ठरला आहे. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मभूषण पुरस्कार बहाल करण्यात आला.


देशभक्तीचा रंग चढला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पद्मभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर धोनीवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. याबद्दल माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवागनेही धोनीला शुभेच्छा दिल्या आणि धोनीला सेनेच्या वर्दीत पाहुन सेहवागवरही देशभक्तीचा रंग चढला. 


सेहवागने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. त्यात सेहवाग आणि राहुल द्रविड सेनेच्या वर्दीत दिसत आहेत. फोटो शेअर करत सेहवाने लिहिले की, #इंडियनआर्मी #जयहिंद.



धोनीला यापूर्वी मिळाले हे पुरस्कार


यापूर्वी धोनीला २००७ मध्ये देशातील सर्वोच्च खेळ सन्मान राजीव गांधी खेलरत्न तर २००९ मध्ये देशातील चौथा सर्वोच्च नागरिक सम्मान पद्मश्री देण्यात आला आहे.