कोलकाता : टीम इंडियाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागला माजी कर्णधार सौरभ गांगुलीने खडेबोल सुनावलेत. सेहवागने प्रशिक्षकाबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यावरुन त्याने सेहवागला मूर्ख म्हटलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बीसीसीआय'मध्ये सेटिंग नसल्याने आपण टीम इंडियाचा प्रशिक्षक होऊ शकलो नाही, असे विधान वीरेंद्र सेहवागने करुन खळबळ उडवून दिली. सेहवागच्या विधानावर सौरभ गांगुलीने प्रतिक्रिया दिलेय. 'सेहवागचे म्हणणे मुर्खपणाचे आहे आणि मला त्याबाबत फार काही बोलायचे नाही.


सेहवागने एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत बीसीसीआयच्या प्रशिक्षक निवडीच्या प्रक्रियेवर हल्लाबोल केला होता. सेटिंगशिवाय काहीही होत नाही, असे म्हटले होते. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनीच प्रस्ताव ठेवला म्हणून मी प्रशिक्षकपदासाठी अर्ज भरला. पण सेटिंग नसल्याने मी स्पर्धेतून बाहेर झाल्याचे म्हटले होते.