Video - वीरूने पाकिस्तानी गोलंदाजांना धू-धू धुतले, पण झाले असे काही...
स्वीत्झरलँडच्या सेंट मोरिट्समध्ये आईस क्रिकेटचा पहिला सामना अपेक्षेनुसार रोमांचक राहिला. टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने पाकिस्तानी गोलंदाजांना धू-धू धुतले. परंतु, धडाकेबाज फलंदाजी करूनही त्यांचा संघ जिंकू शकला नाही.
सेंट मोरिट्स (स्वीत्झरलँड) : स्वीत्झरलँडच्या सेंट मोरिट्समध्ये आईस क्रिकेटचा पहिला सामना अपेक्षेनुसार रोमांचक राहिला. टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने पाकिस्तानी गोलंदाजांना धू-धू धुतले. परंतु, धडाकेबाज फलंदाजी करूनही त्यांचा संघ जिंकू शकला नाही.
स्वीत्झरलँडच्या बर्फाच्छादित भागात सेहवागच्या डायमंड्स XI आणि आफ्रीदीच्या रॉयल्स XI मध्ये पहिला सामना खेळला गेला. यात आफ्रिदीच्या टीमने ६ विकेटने विजय मिळवला.
वाचा आणखी रबाडाची एक शिवी आणि विराटने १५ सेकंदात सेट केला मॅचचा निकाल
सामन्यात सेहवागने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. डायमंड्सने २० षटकात ९ विकेट गमावून १६४ धावा केल्या. यात सेहवागच्या धडाकेबाज फलंदाजीचा समावेश होता. त्याने शोएब अख्तरसह इतरांना धू-धू धुतले. ३१ चेंडूत ६२ धावांची खेळी केली. अँड्र्यू सायमंड्सने ताबडतोब ४० धावा केल्या. रॉयल्सकडून अब्दुल रज्जाक याने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. शोएब अख्तर २ आणि आफ्रिदीने एक विकेट घेतली.
लक्ष्याचा पाठलाग करताना मैदानात उतरलेल्या आफ्रिदीच्या टीमची सुरूवात खराब झाली. पण ओवेश शहा याने ३४ चेंडूत ७४ धावा काढत सामना जिंकला. त्याच्याशिवाय जॅक कॅलिस ३६ आणि ग्रॅम स्मीथ २३ धावा केल्या. डायमंड्सकडून रमेश पोवार याने २, लसिथ मलिंगा आणि आगरकर यांनी १-१ विकेट घेतल्या. ओवेश शहाला मॅन ऑफ द मॅच खिताब देण्यात आाला.