मुंबई: एकाच दिवशी तीन बॉलर्सनी धमाका केला आहे. हॅट्रिकची हॅट्रिक करत अजब विक्रम रचला आहे. या तीन बॉलर्सचं कौतुक होत आहे. आता असा प्रश्न पडला असेल कसं शक्य आहे? तर हो असं खरंच घडलं आहे. इंग्लंडच्या Vitality Blast T20 टुर्नामेंट दरम्यान तीन बॉलर्सनी हॅट्रिक केली आहे. त्यापैकी 2 खेळाडू न्यूझीलंडचे आहेत. न्यूझीलंडच्या दोन दिग्गज खेळाडूंनी हा विक्रम केल्यानं पुन्हा एकदा न्यूझीलंडची कॉलर ताठ झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकच दिवसात डबल हॅट्रिकची कमाल
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या Vitality Blast T20 टुर्नामेंटमध्ये 3 बॉलर्सनी 3 विकेट्स घेऊन हॅट्रिक केली आहे. त्यापैकी 2 बॉलर्स न्यूझीलंड संघाचे असून त्यांनी हा अजब विक्रम रचला आहे. एडम मिल्ने आणि लॉकी फर्ग्युसन अशी या बॉलर्सची नावं आहेत. याशिवाय इंग्लंडच्या ब्लेक कुलेन नावाच्या बॉलरनेही 3 विकेट्स घेतल्या आहेत.



एडम मिल्ने याने केंटकडून खेळताना त्याने 3 विकेट्स घेतल्या आहेत. 19 व्या ओव्हरमध्ये चौथ्या बॉलवर ऑली पोपची विकेट घेतली. त्यानंतर दुसऱ्याच बॉलवर काइल जेमिन्सन आणि तिसरी लॉरी इवेंसला आऊट करत हॅट्रिक केली. मिल्नेने शेवटच्या ओव्हर्समध्ये आपली कामगिरी उत्तम करत संघाला विजय मिळवून दिला.


मिल्नेसोबत त्याचा मित्र लॉकी फर्ग्युसनने यॉर्कशायरकडून खेळत लंकाशायर विरुद्ध 3 विकेट्स घेऊन हॅट्रिक केली. फर्ग्युसननेही 20 व्या ओव्हरमध्ये शेवटच्या 3 बॉल्सवर ल्यूक वेल्स, ल्यूक वुड आणि टॉम हार्टली यांची विकेट घेऊन त्यांना तंबुत धाडलं. फर्ग्युसनने यॉर्कशायर संघाला अवघ्या 9 धावांनी जिंकवून दिले. या दोघांव्यतिरिक्त मिडिलसेक्सचा बॉलर ब्लेक कुलेन याने 3 विकेट्स घेऊन फलंदाजांना तंबुत धाडलं. या तिघांच्या एकाच दिवशी केलेल्या विक्रमानं त्य़ांचं कौतुक होत आहे.