मुंबई: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर टीम इंडिया A चे कोच रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनावर प्रश्नचिन्हं उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे टीम इंडियाच्या 2 खेळाडूंनी टीम B च्या कोचवर अधिक विश्वास असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता क्रिकेट विश्वास मोठ्या चर्चांना उधाण आलं आहे. इतकच नाही तर लवकरच टीम B चे कोच राहुल द्रविड यांच्याकडे नवी जबाबदारी येणार का? अशीही एक चर्चा सुरू झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाची टीम A इंग्लंड दौऱ्यावर आहे. WTCचा अंतिम सामना हातून गेला. आता इंग्लंड सीरिजकडे सर्वांचं लक्ष आहे. तर शिखर धवनच्या नेतृत्वात श्रीलंकेविरुद्ध मर्यादित षटका खेळण्यासाठी टीम B सज्ज आहे. टीम Bच्या कोचची जबाबदारी दिग्गज फलंदाज राहुल द्रविडकडे आहे.


व्हीव्हीएस लक्ष्मण यांचं मोठं विधान


टीम इंडियाचे माजी दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या म्हणण्यानुसार, कोच म्हणून श्रीलंका दौर्‍यावर टीम इंडियासह राहुल द्रविड उत्तम कामगिरी करेल. राहुल द्रविडकडे भावी चॅम्पियन होण्याची संधी आहे. पुढे लक्ष्मण म्हणाले की, 'मला वाटत नाही की द्रविडवर काही दबाव असेल. त्याला भारतीय क्रिकेटसाठी भविष्यात चॅम्पियन बनवलं जाण्याची संधी असेल. या मालिकेत प्रत्येकाला खेळण्याची संधी मिळणे आवश्यक नाही. पण द्रविडबरोबर वेळ घालवणे आणि त्याचा अनुभव शेअर करणे या खेळाडूंचे भविष्य घडविणार आहे.


Love की Arrange Marriage? चाहत्याच्या गुगलीवर स्मृतीचा मास्टरस्ट्रोक, म्हणाली....


इरफान पठाण काय म्हणाला


माजी भारतीय संघाचा अष्टपैलू इरफान पठाण म्हणाला, 'राहुल द्रविड स्पष्ट चर्चा करतो. टीम इंडियाचा कर्णधार असतानाही द्रविड तरूणांसोबत खूप स्पष्टपणे वागायचा आपली मतं भूमिका स्पष्ट असायच्या. जर कोणाला काही अडचण असेल तर तो जाऊन आरामात त्यांच्याशी बोलायचा आणि आजही ही परिस्थिती कायम आहे. यावेळी 2007 च्य़ा वर्ल्ड कपचा किस्सा देखील पठाणने शेअर केला आहे.