Love की Arrange Marriage? चाहत्याच्या गुगलीवर स्मृतीचा मास्टरस्ट्रोक, म्हणाली....

स्मृती (Smriti Mandhana) तु अरेंज मॅरेज करणार की लव, असा प्रश्न एका चाहत्याने स्मृतीला ट्विटरवर विचारला.  

Updated: Jul 4, 2021, 10:51 PM IST
Love की Arrange Marriage? चाहत्याच्या गुगलीवर स्मृतीचा मास्टरस्ट्रोक, म्हणाली.... title=

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघ (India Womens Cricket Team) सध्या इंग्लंड दौऱ्यावर (India Tour England 2021) आहे. या दौऱ्यात भारताने इंग्लंड विरुद्ध कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळली आहे. त्यानंतर आता 9 जुलैपासून 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे. टीम इंडियाची सलामीवीर स्मृती मनधाना (Smriti Mandhana) सध्या चांगलीच चर्चेत आहे. स्मृती नेहमीच तिच्या दिलखेचक फोटोमुळे चर्चेत असते. त्यामुळेच ती काही दिवसातच भारताची नॅशनल क्रश (National Crush) झाली. स्मृती सोशल मीडियावर चांगली अॅक्टीव्ह असते. दरम्यान काही दिवसांपासून एक ट्विट चांगलंच व्हायरल होतंय. यामध्ये स्मृती तु अरेंज मॅरेज करणार की लव, असा प्रश्न एका चाहत्याने स्मृतीला ट्विटरवर विचारला. यावर स्मृतीने स्मार्ट उत्तर दिलंय. (indian women cricketer smiriti mandhana gives smart answer to fans who ask question about marriage) 

स्मृती काय म्हणाली? 

चाहत्याने टाकलेल्या गुगलीवर स्मृतीने चांगलाच मास्टरस्ट्रोक लगावला. चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर स्मृतीने भन्नाट उत्तर दिलंय. लव मेरेज करणार की अरेंज यावर स्मृतीने 'लव-रेंजड' करणार असल्याचं म्हटलं.  

सध्या क्रिकेटवर लक्ष

स्मृतिने वयाच्या 17 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. स्मृती सध्या 24 वर्षांची आहे. ती सध्या क्रिकेटमधील पुढील वाटचालीवर भर देत आहे. सध्या तरी स्मृतीचं लग्न करण्याचा कोणताही विचार नाही. पण तिने स्पष्ट केलं की तिला कशाप्रकारे लग्न करायला आवडेल.  

कमी वयात मोठी कामगिरी

स्मृतिने  कमी वयात शिखर गाठलंय.  स्मृतीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक लगावण्याचा कारनामा केलाय. स्मृती वनडेत द्विशतक ठोकणारी पहिलीच भारतीय महिला क्रिकेटर आहे. स्मृतीने 2013 मध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून तिने मागे वळून पाहिलेलं नाही. दरम्यान इंग्लंड विरुद्ध येत्या 9 जुलैपासून 3 टी 20 सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे.

संबंधित बातम्या : 

महेंद्रसिंह धोनीने पत्नी साक्षीला Wedding Anniversary Gift म्हणून कोणती कार दिली? अंदाज लावा कोणती असेल?

है तयार हम! श्रीलंकेत भारतीय युवा संघाचा सराव सुरु, BCCIने शेअर केला व्हिडिओ