दुबई : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले. यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध आणखी ताणले गेले आहेत. आगामी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारतानं पाकिस्तानविरुद्धची मॅच खेळू नये, अशी भूमिका काही माजी क्रिकेटपटू आणि प्रशासकांनी मांडली आहे. याबद्दल भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यानं वियॉन ग्लोबल समिट(WION Global Summit) त्याचं मत मांडलं आहे. ही वेळ देशासोबत उभं राहण्याची आहे, असं लक्ष्मण म्हणाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झी मीडियाचं आंतरराष्ट्रीय चॅनल WION च्या ग्लोबल समिटमध्ये क्रिकेटपासून दहशतवादापर्यंत प्रत्येक विषयावर भाष्य केलं. 'भारत आणि पाकिस्तानचे संबंध पुलवामा हल्ल्यामुळे ताणले गेले आहेत, यामुळे वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्ताननं खेळावं का?' असा प्रश्न लक्ष्मणला विचारण्यात आला. तेव्हा 'सध्या क्रिकेट शेवटची गोष्ट आहे, जी सध्या माझ्या डोक्यात आहे.' असं उत्तर लक्ष्मणनं दिलं.


पुलवामा हल्ला : पाकिस्तानला एकदाच शेवटचा धडा शिकवा; चहल संतापला


 


लक्ष्मण यापुढे म्हणाला की, 'देशावर मोठा हल्ला झाला आहे. प्रत्येक भारतीय हा संतापलेला आहे. आमच्या जवानांना वीरमरण आलं आहे. हे जवान आम्ही सुरक्षित राहू हे निश्चित करत होते. त्यामुळे क्रिकेट सध्या माझ्या डोक्यात नाही. सध्या आपण जवानांच्यासोबत उभं राहणं गरजेचं आहे. आपल्याला शहिदांच्या कुटुंबांना पाठिंबा देणं गरजेचं आहे. एक देश म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत. सध्या सर्व भारतीय जो विचार करत आहेत, तोच विचार मी करत आहे.'


वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळू नका, हरभजनची मागणी


'भारत आणि पाकिस्तानमधल्या तणावपूर्ण संबंधांमुळे आमच्यावरही त्यांच्याविरुद्ध क्रिकेट खेळताना दबाव असायचा. अशा संबंधांमुळे क्रिकेटपटूंकडून जास्त अपेक्षा असतात. पण तुम्ही फक्त खेळावर लक्ष केंद्रीत केलं, तरच चांगली कामगिरी करू शकता. मैदानातल्या प्रेक्षकांचा किंवा बाहेरच्यांचा तणाव विसरून तुम्हाला खेळावं लागतं,' अशी प्रतिक्रिया लक्ष्मणनं दिली. 


..तर वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना नाही