फलंदाजीआधी अंघोळ करण्याची अजब सवय पडली महागत...बॅटिंगचा टर्न चुकला आणि...
अंघोळीच्या नादात बॅटिंगचा टर्न चुकला मग कोण गेलं मैदानात नेमका काय गोंधळ झाला, मजेशीर किस्सा
मुंबई: टीम इंडियाचे खेळाडू दौऱ्यादरम्यान अनेक गमतीशीर गोष्टी करत असतात. पण असाच एक प्रसंग अंगाशी आला ही सवय महागात पडली आणि एका ऐवजी दुसऱ्याला फलंदाजीची संधी मिळाली. हा गमतीशीर किस्सा चक्क टीम इंडियाचे कर्णधार सौरव गांगुली यांनी सांगितला आहे.
व्ही व्ही लक्ष्मण यांना सामना सुरू असताना फलंदाजी आधी अंघोळ करण्याची सवय होती. सागरसंगीत छान वेळ घेऊन ते अंघोळ करायचे आणि त्यानंतर तयार होऊन क्रीझवर खेळायला यायचे. दक्षिण अफ्रिका दौऱ्यादरम्यान एक मजेशीर किस्सा घडला होता.
लक्ष्मण अंघोळीसाठी गेले. त्यावेळी केप्टाउनमध्ये सामना सुरू होता. विकेट गेली आणि लक्ष्मण यांचा नंबर आला. मात्र लक्ष्मण अंघोळ करण्यात मग्न होते. त्यांना हरभजन सिंहने याची माहिती दिली. मात्र हरभजनचं म्हणणं त्यांनी मनावर घेतलं नाही. त्यांना वाटलं भज्जी आपली मजा करतो आहे.
सचिन तेंडुलकर देखील त्यांना अलर्ट करण्यासाठी आले त्यावेळी क्रीझवर पकटन जाणं महत्त्वाचं होतं. तिथे सौरव गांगुली होते. त्यांना कोच आणि इतर खेळाडूंनी मिळून काही मिनिटांत तयार केलं आणि क्रीझवर फलंदाजीसाठी पाठवलं. फलंदाजीची कोणतीही तयारी नसतानाही सौरव गांगुली त्यावेळी क्रीझवर उतरले होते.
सौरव गांगुली यांनी त्यावेळी 46 धावा केल्या होत्या. लक्ष्मण अंघोळ करून बाहेर आल्यावर त्यांनी विचारलं आणि हा सगळा घोळ समोर आला. या घटनेनंतर अर्थातच लक्ष्मण यांना कोण मुद्दाम केलं असं जबाबदार धरलं नाही. पण आजही हा किस्सा आठवला की सर्व खेळाडू मनापासून त्यावर हसतात.
व्ही व्ही लक्ष्मण टीम इंडियातील सर्वात महान फलंदाज म्हणून ओळखले जातात. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वात जास्त उत्तम प्रदर्शन करणारे आणि सर्वात जास्त सामने खेळून चांगली कामगिरी करणारे लक्ष्मण हे क्रिकेटपटू आहेत. सचिननंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2000 हून अधिक धावा करणारे ते भारतीय खेळाडू ठरले आहेत.