मुंबई : भारत - न्युझिलंड दरम्यानच्या ३ एकदिवसीय सामन्यांना आजपासून सुरूवात झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचा कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहली आज २०० वा एकदिवसीय सामना खेळत आहे.  १९९  मॅचदरम्यान त्याने  ८७६७रन्स बनवले आहेत.  यामध्ये ३० शतक आणि ४५ अर्धशतकांचा समावेश आहे. 


न्युझिलंड विरोधातील पहिल्या एकदिवसीय सामन्याची सुरूवात भारतासाठी थोडी रखडत झाली आहे. भारताने पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. 


तिसर्‍या ओव्हरमध्ये भारताची पहिली विकेट पडली. शिखर धवन आऊट झाल्यानंतर विराट कोहली बॅटिंगसाठी मैदानात उतरला. तेव्हा वानखेडे स्टेडीयममध्ये प्रेक्षकांनी ' कोहली कोहली' असा जल्लोष केला. 



 


विराट आल्यानंतर रोहित शर्मा  फार काळ टिकू शकला नाही. रोहित शर्मा पाचव्या ओव्हरमध्ये लागोपाठ दोन छक्के मारल्यानंतर आऊट झाला. रोहितने 18 बॉलमध्ये २० धावा केल्या. 


रिकी पॉंटिंगचा रेकॉर्ड मोडीत काढला 


अंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतक ठोकण्याच्या विक्रमामध्ये  विराट कोहली आणि रिकी पॉंटिंग हे दोघेही ३० शतकांवर होते. मात्र आज वानखेडेवर विराटने ३१ वे शतक ठोकले आहे. त्यामुळे रिकी पॉंटिंगचाही रेकॉर्ड मोडीत निघाला आहे. 


आता या विश्वविक्रमामध्ये विराटच्या पुढे केवळ मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे नाव आहे. सचिन तेंडुलकरने ४९ शतकं ठोकली आहेत.