कोलंबो : श्रीलंकेमध्ये झालेल्या टी-20 ट्रायसीरिजच्या फायनलमध्ये भारतानं बांग्लादेशचा पराभव केला. शेवटच्या बॉलला ५ रन्सची आवश्यकता असताना दिनेश कार्तिकनं सिक्स मारून भारताला विजय मिळवून दिला. दिनेश कार्तिक भारताच्या विजयाचा शिल्पकार असला तरी संपूर्ण सीरिजमध्ये वॉशिंग्टन सुंदरनं उल्लेखनीय कामगिरी केली. भारताच्या फास्ट बॉलरना फारसं यश येत नसताना वॉशिंग्टन सुंदरनं प्रतिस्पर्धी टीमच्या विकेट घेतल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वॉशिंग्टन सुंदरनं टी-20 सारख्या फॉरमॅटमध्ये फक्त ५.७०च्या स्ट्राईक रेटनं रन्स दिले. वॉशिंग्टन सुंदरनं ५ इनिंगमध्ये सर्वाधिक ८ विकेट घेतल्या. या कामगिरीबद्दल वॉशिंग्टन सुंदरला मॅन ऑफ द सीरिज देऊन गौरवण्यात आलं. सगळ्यात लहान वयामध्ये मॅन ऑफ द सीरिजचा पुरस्कार मिळणारा वॉशिंग्टन सुंदर हा पहिला खेळाडू ठरला आहे. याआधी पाकिस्तानचा फास्ट माजी फास्ट बॉलर वकार युनुसच्या नावावर हा रेकॉर्ड होता. तर भारताचे माजी स्पिनर नरेंद्र हिरवाणी या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होते.


सगळ्यात लहान वयात मॅन ऑफ द सीरिज


वॉशिंग्टन सुंदर- १८ वर्ष १६४ दिवस- साल २०१८


वकार युनूस- १८ वर्ष १६९ दिवस- साल १९९०


नरेंद्र हिरवाणी- १९ वर्ष १६६ दिवस- साल १९८८


हे रेकॉर्ड करणारा दुसरा खेळाडू 


डिसेंबर २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मध्ये भारताचा कॅप्टन रोहित शर्मानं सुरुवातीलाच वॉशिंग्टन सुंदरला बॉलिंग दिली. कोणत्याही आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये पहिली ओव्हर टाकणारा वॉशिंग्टन सुंदर सर्वात लहान दुसरा खेळाडू बनला. त्यावेळी वॉशिंग्टन सुंदरचं वय १८ वर्ष ८० दिवस होतं. या यादीमध्ये अफगाणिस्तानचा स्पिन बॉलर मुजीब जादरान पहिल्या क्रमांकावर आहे. आयर्लंडविरुद्धच्या वनडेमध्ये जादराननं पहिली ओव्हर टाकली होती. त्यावेळी त्याचं वय १६ वर्ष २५४ दिवस होतं.