मोहाली : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये रोहित शर्मानं वनडे क्रिकेटमधलं तिसरं द्विशतक झळकावलं. वनडे क्रिकेटमध्ये तीन द्विशतक झळकावणारा रोहित शर्मा पहिला क्रिकेटपटू बनला आहे. सगळीकडे रोहितच्या द्विशतकाची चर्चा असतानाच या मॅचमध्ये वॉशिंग्टन सुंदरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. या मॅचमध्ये कुलदीप यादवऐवजी स्पिनर वॉशिंग्टन सुंदरला संधी देण्यात आली आहे. भारताकडून क्रिकेट खेळणारा सुंदर हा ७वा लहान खेळाडू बनला आहे.


सगळ्यात लहान खेळाडू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताकडून सगळ्यात लहान वयामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरनं पदार्पण केलं होतं. सचिननं १६ वर्ष आणि २३८ दिवसांचा असताना पहिली आंतरराष्ट्रीय मॅच खेळली. तर दुसऱ्या क्रमांकावर मनिंदर सिंग आहेत. मनिंदर सिंग यांनी १७ वर्ष २२२ दिवसांचे असताना पहिली आंतरराष्ट्रीय मॅच खेळली. यानंतर हरभजन सिंगनं १७ वर्ष २८८ दिवसांचा असताना पहिली मॅच खेळली.


पार्थिव पटेल(१७ वर्ष ३०१ दिवस), लक्ष्मी शुक्ला(१७ वर्ष ३२० दिवस) आणि चेतन शर्मा(१७ वर्ष ३३८ दिवस) हे भारताकडून खेळलेले सगळ्यात लहान खेळाडू आहेत. वॉशिंग्टन सुंदर भारताकडून वनडे क्रिकेट खेळणारा २२०वा खेळाडू आहे. 


सुंदरला एका कानानंचं येतं ऐकू


वॉशिंग्टन सुंदरला एका कानानंच ऐकू येतं. लहानपणापासूनच वॉशिंग्टन सुंदरला ही समस्या आहे. वॉशिंग्टन सुंदर ४ वर्षांचा असताना त्याच्या घरच्यांना याबाबत कळलं होतं. यानंतर अनेक डॉक्टरांकडे उपचार करण्यात आले पण कानावर अजून कोणताही इलाज झालेला नाही.