नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी लेग स्पिनर वसीम अकरम याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला "खरा हिरो" म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1992 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा खेळाडू वसीम अकरम याने शारजा येथे आयोजित केलेल्या बुक फेअरमध्ये हे विधान केलं आहे. या प्रसंगी, सचिन तेंडुलकरचं त्याने खूप कौतूक केलं.


"महान व्यक्ती, खरा खेळाडू, इतक्या मोठ्या कारकीर्दीनंतरही त्याचा काही वाद निर्माण झाला नाही. खेळाच्या मैदानावर किंवा मैदानाबाहेर असो, तो नेहमी क्रिकेटला जिंकत आहे. सचिनच्या रुपात जगाने सर्वात महान क्रिकेटरला पाहिले आहे.'


सचिन तेंडुलकरची स्तुती करतांना त्याने म्हटलं क, सुनील गावस्करची विकेट घेणे संपूर्ण कारकिर्दीतला बहुमुल्य क्षण होता. 2015 मध्ये देखील वसीम अकरमने सचिनच्या टॅलेन्टची प्रशंसा केली होती.


अकरम म्हणाला की, "जेव्हा मी सचिनला पहिल्यांदा पाहिले, तेव्हा मला एवढंच जाणवलं की या मुलाला काहीतरी विशेष आहे. जेव्हा त्याने पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केले तेव्हा मला त्याची टेकनीक आणि ज्या पद्धतीने तो खेळला ते पाहून मला आश्चर्य वाटले. त्याच्या हनुवटीवर बॉल लागल्यानंतरही त्याने जी काही प्रतिक्रिया दिली ते पाहून आश्चर्यचकित झालो. तो आपले आवडते शॉट्स खेळायचा हे देखील आम्ही पाहिलंय. यानंतर त्यांने मला बरोबर सिद्ध केले. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके ठोकत जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक बनला.'