टीम इंडियाच्या पराभवानंतर पाकिस्तानचा Wasim Akram भावूक, म्हणतो `संधी मिळायला हवी पण...`
Wasim Akram On IND vs AUS Final : फायनलसारख्या सामन्यांमध्ये टॉस महत्त्वाचा ठरतो, हे मोठ्या सामन्यांसाठी चांगलं नाही, असं मत वसिम अक्रम याने नोंदवलं आहे.
Wasim Akram on India's defeat in World Cup Final : फायनलसारख्या सामन्यांमध्ये टॉस महत्त्वाचा ठरतो, हे मोठ्या सामन्यांसाठी चांगलं नाही, असं मत वसिम अक्रम (Wasim Akram) याने नोंदवलं आहे. फायनल सामन्यात खेळपट्टीचा अंदाज घेऊन पॅट कमिन्सने योग्य निर्णय घेतला. त्याचा फायदा त्यांना ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीदरम्यान आणि भारताच्या फलंदाजीवेळी देखील झाल्याचं देखील दिसून आलं. याच मुद्द्यावर बोट ठेऊन वसिम अक्रम याने मोठं वक्तव्य केलं आहे.
नेमकं काय म्हणतो Wasim Akram?
दोन्ही संघांनी अंतिम फेरी गाठण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. अशा परिस्थितीत दोन्ही संघांना सामन्यात समान संधी मिळायला हवी. टॉसवर खेळाचा निर्णय घेतला जाऊ नये. मला माहीत आहे की यामुळे डे नाईट मॅचला जास्त चाहते स्टेडियमवर येतील. टीव्ही टेलिकास्ट अधिक फायदेशीर होईल. जास्तीत जास्त लोक टीव्हीवर मॅच बघतील. प्रेक्षकसंख्या वाढेल.पण एवढा खेळ केल्यावर मॅचमध्ये टॉस महत्त्वाचा ठरला तर मग दोन्ही संघांसाठी ही समस्या असेल. हे नुकसान आहे. तुम्ही खूप मेहनत करून अंतिम फेरीत पोहोचला आहात. तुम्हाला समान संधी मिळायला हवी, असं स्पष्ट मत वसिम अक्रम याने नोंदवलं आहे.
जेव्हा मॅचमध्ये दव पडण्याची शक्यता असले, तेव्हा तुम्ही सामने दुपारचे आयोजित केले पाहिजे. दोन्ही संघांना समान संधी द्यायची असेल तर काहीतरी करावे लागेल. प्लेऑफ सामन्यातच असा विचार करायला हवा, त्यामुळे तुम्हाला टॉसवर खुप अवलंबून राहता येणार नाही. मोठ्या सामन्यात कडवी टक्कर झाली पाहिजे. दोन्ही संघांना समान संधी मिळाली की सामन्याची मजा खरी असते, असं वसिम अक्रम यांनी म्हटलं आहे.
World Cup Final : टीम इंडियाच्या पराभवाला जबाबदार कोण? रडकुंडीला आलेला Rohit Sharma म्हणतो...
दरम्यान, टॉस आणि मैदानावरील दव यांचा परिणाम सामन्यावर होऊ देयचा नसेल तर वनडे क्रिकेटचं चित्र बदलावं लागेल, असं सचिन तेंडूलकर याने म्हटलं होतं. 25-25-25-25 ओव्हरचे चार डाव खेळले जावेत, अशी संकल्पना सचिन तेंडूलकरने काही दिवसांपूर्वी मांडली होती. त्यामुळे खऱ्या अर्थाने खेळाडूंची कसोटी लागेल, असंही सचिन म्हणाला होता.