World Cup Final : टीम इंडियाच्या पराभवाला जबाबदार कोण? रडकुंडीला आलेला Rohit Sharma म्हणतो...

India Lose World Cup Final : पराभवानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) दु:खात दिसत होता. त्याचे डोळे लालबुंद झाल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे तो जास्त काही बोलला नाही. पोस्ट मॅच प्रेझेंटेशनवेळी रोहितला सामन्याच्या कामगिरीबद्दल विचारण्यात आलं.

सौरभ तळेकर | Updated: Nov 20, 2023, 12:40 AM IST
World Cup Final : टीम इंडियाच्या पराभवाला जबाबदार कोण? रडकुंडीला आलेला Rohit Sharma म्हणतो...  title=
Rohit Sharma Why team India loss world cup final

Rohit Sharma On World Cup Final : अहमदाबादमध्ये झालेल्या वर्ल्ड कपच्या फायनल सामन्यामध्ये (World Cup 2023) ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा विकेट्सने पराभव केला. त्यामुळे आता 12 वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न आता अपूर्ण राहिल्याचं पहायला मिळत आहे. टीम इंडियाच्या पराभवानंतर भारतीय खेळाडूंच्या डोळ्यात अश्रू पहायला मिळाले. त्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) संघाच्या कामगिरीवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

काय म्हणाला रोहित शर्मा?

पराभवानंतर रोहित शर्मा दु:खात दिसत होता. त्याचे डोळे लालबुंद झाल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे तो जास्त काही बोलला नाही. पोस्ट मॅच प्रेझेंटेशनवेळी रोहितला सामन्याच्या कामगिरीबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा, 'सामन्याचा निकाल आमच्या बाजूने लागला नाही. आज आम्ही विजयासाठी आवश्यक तेवढा चांगला खेळ करू शकलो नाही याची आम्हाला कल्पना आहे. पण मला संघातल्या प्रत्येकाच्या कामगिरीचा अभिमान आहे', असं रोहित शर्मा याने म्हटलं आहे. त्यावेळी रोहित शर्माच्या डोळ्यात पाणी आल्याचं दिसून येत होतं.

निकाल आमच्या वाटेला गेला नाही. आज आम्ही पुरेसे चांगले नव्हतो. आम्ही सगळे प्रयत्न केले पण तसे व्हायला नको होते. 20-30 धावा आणखी चांगल्या झाल्या असत्या, केएल आणि कोहली चांगली भागीदारी करत होते आणि आम्ही 270-280 च्या धावसंख्येकडे पाहत होतो पण आम्ही विकेट गमावत राहिलो. जेव्हा तुमच्याकडे 240 धावा असतात तेव्हा तुम्हाला विकेट घ्यायच्या असतात. आम्ही बोर्डावर पुरेशा धावा केल्या नाहीत. सीमर्सने आघाडीवर असताना आम्ही ते 3 विकेट्स घेतल्या. मात्र, पुढे आम्हाला जाता आलं नाही, असं म्हणत रोहितने निराशा व्यक्त केली आहे.

राहुल द्रविड म्हणतात...

रोहित शर्मा एक उत्तम कर्णधार आहे. स्टाफचा आत्मविश्वास कायम राहण्यासाठी त्याने प्रयत्न केला. तो एक चांगला कर्णधार आणि सर्वांनाच नेहमी मदत करणारा व्यक्ती आहे. ड्रेसिंग रूममध्ये तो नेहमी इतर खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करतो. आम्ही लक्ष्यापेक्षा 30 ते 40 धावा कमी केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने  खरोखरच चांगली गोलंदाजी केली. महत्त्वाच्या वेळी आम्ही विकेट्स गमावल्या. मात्र, आम्हाला ते करता आलं नाही, असं राहुल द्रविड यांनी म्हटलं आहे.