Wasim Akram: पाकिस्तानला फास्टर बॉलर्सची (Pakistan Cricket) खाण म्हटलं जातं. त्यात न चुकता नाव येतं ते वसिम अक्रम (Wasim Akram) यांचं. वसिम अक्रम यांनी नव्वदीचं शतक गाजवलं ते आपल्या गोळीगत गोलंदाजीने... एकदा हातातून बॉल सुटला की भल्या भल्या फलंदाजांचे डोळे गरगर करायचे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 916 विकेट्स घेण्याचा भलामोठा विक्रम वसीम अक्रमच्या (Wasim Akram Record) नावावर आहे. आता वसिम अक्रमने क्रिकेटला रामराम ठोकलाय. मात्र, त्यांचं नावाची आजही चर्चा होते. अशातच आता वसिम अक्रम पुन्हा चर्चेत आलेत ते त्यांच्या आत्मकथेमुळे... (Wasim Akram's autobiography Sultan A Memoir in discussion a shocking revelation about the Javed Miandad marathi news)


Wasim Akram यांनी आत्मकथेत काय लिहिलंय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वसीम अक्रम यांची सुलतान: अ मेमोयर (Sultan: A Memoir) हे आत्मकथा (Autobiography) सध्या चर्चेत आहे.या आत्मचरित्रात त्यांनी अनेक मोठे खुलासे केले आहेत. त्यावेळी त्यांनी आपल्या गुरूचा आदर करणे विसरले नाहीत. माझं करिअर घडवण्यात पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू जावेद मियांदाद (Javed Miandad) यांचा वाटा होता, असं वसिम अक्रम यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलंय.


वसीम अक्रम म्हणतात, 1985 मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचा तत्कालीन कर्णधार जावेद मियांदादने सिलेक्टर्सला माझ्या नावावर विचार करण्यास सांगितलं होतं, त्यानंतर काही दिवसांनी माझं नशीब उघडलं. वयाच्या 18 व्या वर्षी मी अज्ञात क्लब क्रिकेटर झाला. 1985 मध्ये पाकिस्तानच्या न्यूझीलंडच्या दौर्‍यावर त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण झाले, ज्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची (Wasim Akram Career) शानदार सुरुवात केली.


आणखी वाचा - IND vs NZ 3rd ODI : तिसरी वनडे जिंकण्यासाठी Shikhar Dhawan टीममध्ये करणार मोठे बदल?


दरम्यान, वसिम अक्रम यांनी तब्बल दोन दशकं क्रिकेट जगतात आपली वेगळी ओळख निर्माण केली. उंच धिप्पाड गोलंदाज धावत येयचा त्यावेळी फलंदाजाला देखील घाम फुटायचा. अक्रमने 356 एकदिवसीय सामन्यांमध्ये 23.52 च्या सरासरीने 502 विकेट घेतले आहेत. तर 1992 वर्ल्ड कप फायनलमध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर इंग्लंडविरुद्ध पाकिस्तानला विजय मिळवून दिला. त्यानंतर वसिम अक्रम यांचा जगभरात डंका वाजला.