IND vs NZ 3rd ODI : तिसरी वनडे जिंकण्यासाठी Shikhar Dhawan टीममध्ये करणार मोठे बदल?

आता तिसरी वनडे कर्णधार शिखर (Shikhar Dhawan) धवन जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. त्यामुळे तिसऱ्या वनडे सामन्यात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. 

Updated: Nov 29, 2022, 09:57 PM IST
IND vs NZ 3rd ODI : तिसरी वनडे जिंकण्यासाठी Shikhar Dhawan टीममध्ये करणार मोठे बदल? title=

IND vs NZ 3rd ODI Playing 11 : टीम इंडिया सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर (India Tour of New Zealand) आहे. उद्या म्हणजेच बुधवारी यांच्यामध्ये तिसरी आणि निर्णायक वनडे मॅच होणार आहे. पहिल्या वनडे (1st ODI) सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर दुसरा सामना (2nd ODI) पावसामुळे रद्द करण्यात आला. अशा परिस्थितीत आता तिसरी वनडे कर्णधार शिखर (Shikhar Dhawan) धवन जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. त्यामुळे तिसऱ्या वनडे सामन्यात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. 

पहिल्या वनडे सामन्यात पराभवाचा सामना केल्यानंतर दुसऱ्या वनडेमध्ये 2 मोठे बदल करण्यात आले होते. यामध्ये संजू सॅमसन (Sanju Samson) आणि शार्दूल ठाकूरच्या (Shardul Thakur) जागी दीपक हुड्डा (Deepak Hooda) आणि दीपक चाहरला (Deepak Chahar)संधी देण्यात आली होती.

ऋषभ पंतच्या जागी संजू सॅमसनला मिळणार संधी? (Sanju Samson get chance at the place of Rishabh Pant)

न्यूझीलंडविरूद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये संजू सॅमसनला टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये ऋषभ पंत (Rishabh Pant) च्या जागी संधी मिळू शकते. याचं कारण म्हणजे बांगलादेश दौऱ्यावर संजू सॅमसनची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळू शकते. 

दुसऱ्या वनडे सामन्यात युझवेंद्र चहलला देखील संधी मिळू शकते. पहिल्या सामन्यात त्याने साधारण कामगिरी केल्याने त्याचा दुसऱ्या सामन्यात समावेश केला होता. मात्र या सामन्यात त्याला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. याशिवाय दिपक चाहरला देखील खेळण्याची संधी मिळू शकते. उमरान मलिक (Umran Malik) आणि अर्शदीप सिंगने पहिल्या सामन्यात डेब्यू केला होता, त्यामुळे दोघांना खेळण्याची संधी मिळेल.

तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडियाचं संभाव्य प्लेइंग 11

शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, ऋषभ पंत/संजू सॅमसन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, वाशिंगटन सुंदर, दीपक चाहर, उमरान मलिक, अर्शदीप सिंह, युझवेंद्र चहल