याच दिवशी मॅक्युलमने केला हा जबरदस्त रेकॉर्ड, आजपर्यंत कुणालाही तोडता आला नाही
२० फेब्रुवारी याच दिवशी २०१६ साली न्यूझीलंडच्या ब्रँडन मॅक्युलम याने एक जबरदस्त रेकॉर्ड केला होता. मॅक्युलमचा हा रेकॉर्ड आजपर्यंत कुणालाच तोडता आलेला नाहीये.
नवी दिल्ली : २० फेब्रुवारी याच दिवशी २०१६ साली न्यूझीलंडच्या ब्रँडन मॅक्युलम याने एक जबरदस्त रेकॉर्ड केला होता. मॅक्युलमचा हा रेकॉर्ड आजपर्यंत कुणालाच तोडता आलेला नाहीये.
(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)
न्यूझीलंडचा माजी कॅप्टन ब्रँडन मॅक्युलम याने आपल्या टेस्ट करिअरचा शेवटही खास अंदाजात केला. शेवटच्या टेस्ट मॅचमध्ये मॅक्युलमने अवघ्या ५४ बॉल्समध्ये सेंच्युरी केली. या रेकॉर्डसोबतच त्याने विवियन रिचर्ड्स आणि मिसबाह उल हक यांचा रेकॉर्ड तोडला.
शेवटच्या मॅचमध्ये अनेक रेकॉर्ड्स
क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या मॅक्युलमने शेवटच्या आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये अनेक रेकॉर्ड्स केले. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बेसिन रिजर्व येथे झालेली मॅच मॅक्युलमची १०१ वी टेस्ट मॅच होती. डेनियल विटोरी (११२) आणि स्टिफन फ्लेमिंग (१११) यांच्यानंतर मॅक्युलम हा तिसरा खेळाडू बनला आहे.
रिचर्ड्स आणि मिसबाहचा रेकॉर्ड तोडला
मॅक्युलमने तुफानी बॅटिंग करत ५४ बॉल्समध्ये सेंच्युरी लगावली. मॅक्युलमने केलेला हा रेकॉर्ड अद्याप कुणालाही तोडता आलेला नाहीये. यापूर्वी १९८५-८६ मध्ये विवियन रिचर्ड्सने ५६ बॉल्समध्ये सेंच्युरी केली होती. तर, २०१४-१५ मध्ये पाकिस्तानच्या मिसबाह उल हकने ५६ बॉल्समध्ये सेंच्युरी केली होती.
टेस्टमध्ये सर्वाधिक सिक्सर
मॅक्युलमने टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्सर मारण्याचा अॅडम गिलक्रिस्टचा रेकॉर्डही तोडला होता. मॅक्युलमने टेस्टमध्ये १०० हून अधिक सिक्सर लगावले होते. शेवटच्या इनिंगमध्ये १४५ रन्स मॅक्युलमने केले होते. या इनिंगमध्ये त्याने २१ फोर आणि ६ सिक्सर लगावले होते.
टेस्टमध्ये तिसरी सेंच्युरी आणि टी-२०मध्ये दोन सेंच्युरी
न्यूझीलंडच्या कॅप्टनची ही १२ वी टेस्ट सेंच्युरी होती. टेस्टमध्ये त्याच्या नावावर एक ट्रिपल सेंच्युरीही आहे. ही ट्रिपल सेंच्युरी त्याने भारताविरोधात लगावली होती. मॅक्युलमने २६० वन-डे मॅचेसमध्ये ५ सेंच्युरी आणि टी-२० मध्ये २ सेंच्युरी केल्या.