Ashish Nehra Wedding Anniversary: फ्लाईटमध्ये कापला कोचच्या अॅनिव्हर्सरीचा केक; लग्नानंतर सुखी आयुष्य जगायचंय? नेहराने दिला कानमंत्र!
IPL 2023, Gujarat Titans: गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) प्रशिक्षक आशिष नेहराच्या लग्नाचा वाढदिवस (Ashish Nehra Wedding Anniversary) फ्लाईटमध्ये पूर्ण उत्साहात साजरा केला. लग्नानंतर सुखी आयुष्य कसं जगायचं? यावर कानमंत्र दिला आहे. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल (Viral Video) होताना दिसतोय.
Ashish Nehra Wedding Anniversary On Flight: गतविजेत्या गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) यंदाच्या हंगामात देखील दणक्यात सुरूवात केली आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामात गुजरातने पहिल्याच सामन्यात चेन्नईला (CSK) पराभव केला आणि यावर्षी देखील विजयरथ खेचून आणला आहे. त्यामुळे आता संघाचा आत्मविश्वास सातव्या आसमानावर आहे. सामना जिंकत असताना टीममध्ये सेलिब्रेशन देखील जोरदार पद्धतीने केलं जातंय. त्याचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल (Viral Video) होताना दिसतोय.
गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) प्रशिक्षक आशिष नेहरा याच्या लग्नाचा वाढदिवस (Ashish Nehra Wedding Anniversary) 2 एप्रिल रोजी होता. त्यामुळे खेळाडूंनी नियोजन आखलं. टीममधील प्लेयर्सने केक थेट फ्लाईटमध्ये आणला. यावेळी संघातील सर्व खेळाडू उपस्थित होते. तर टीमचे सहाय्यक देखील हाजीर होते. हार्दिक पांड्याने पुढाकार घेऊन केक कापण्याची विनंती केली. अहमदाबादला रवाना होत असताना टायटन्स संघाने आशिष नेहराच्या लग्नाचा वाढदिवस पत्नी रुश्मासोबत मोठ्या थाटात साजरा (Gujarat Titans Celebrate Coach Ashish Nehra Wedding Anniversary) केला.
टायटन्सने केक कापून हा खास प्रसंग साजरा केला. त्यावेळी पांड्याने त्याच्या खास शैलीत हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू असं म्हणत सेलिब्रेशनला सुरूवात केली. त्यावेळी नेहराने केक कापला. त्यावेळी एका खेळाडूकडे बघत अबे शादी करले तू भी, असं म्हणत नेहराने चार चांद लावले. त्यावेळी नेहराने सुखी आयुष्य़ जगण्याचा मंत्र दिला आहे. हॅपी वाईफ हॅपी लाईफ, (Happy Wife, Happy Life) असं म्हणताच फ्लाईटमध्ये एकच हशा पिकला.
पाहा Video
दरम्यान, नेहराने 2 एप्रिल 2009 रोजी रश्माशी लग्न केलं आणि त्यांना दोन मुलं आहेत. पहिल्या सामन्यात चेन्नईला हारवल्यानंतर आता गुजरातचं टार्गेट दिल्लीवर असणार आहे.टायटन्सचा सामना आज 4 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सशी (DC vs GT) होणार आहे. त्यामुळे आता गुजरात हा सामना जिंकून 2 अंक खिशात घालणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय.