गॉल :  श्रीलंकेचा सध्याचा यशस्वी गोलंदाज रंगना हेराथ याला एखाद्या तळातल्या फलंदाजाने सिक्सर मारणे तसे क्वचितच घडते. असे काही श्रीलंका विरूद्ध भारताच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी घडले.  भारताच्या मोहम्मद शमी याने श्रीलंकेच्या या दिग्गज खेळाडूला डोक्यावरून सिक्सर मारला. 
 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


रंगना हेराथला सिक्सर मारल्यानंतर पांड्या आणि शमी जोरात हसू लागले. त्यांना पाहून ड्रेसिंग रूमध्ये असलेल्या विराट कोहली आणि इतर खेळाडूंही हसू आले. शमीने ज्या प्रकारे षटकार लगावला तो अविश्वसनीय होता. 


भारताने आपल्या पहिल्या डावात ६०० धावा केल्या.  यात शमी आणि पांड्याच्या धडाकेबाज खेळीमुळे ही धावसंख्या होऊ शकली.