मुंबई : सोशल मीडियावर सध्या झिवा धोनीचा बोलबाला पहायला मिळतोय. महेंद्रसिंग धोनीची मुलगी अशी ओळख असणा-या झिवानं मल्याळम गाणं गात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलीय.


मल्याळम गाणं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका तमिळ गाण्यानं झिवा धोनीनं सोशल मीडियावर अक्षरक्ष: धुमाकूळ घातलाय. मल्याळम भाषा बोलण्यासाठी सगळ्यात कठीण असते आणि मल्याळम भाषेतून चक्क दोन वर्षीय झिवानं गाणं गायलं.. या गाण्यामुळे टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीची मुलगी झिवा इंटरनेट सेनसेशन बनलीय. 



सोशल नेटवर्किंग साईट इन्स्टाग्रामवर झिवाच्या प्रत्येक व्हिडिओला काही क्षणातच लाखो लाईक्स मिळतात. आता झिवाचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. कनी कन्नुम नेराम कमालनेथरानते हे मल्याणम गाणं अगदी सहज गाताना ती या व्हिडिओत दिसते. 


कुणी शिकवलं गाणं?



झिव्हाला मल्याणम गाणं शिकवण्यामागे तिच्या केअरटेकरचा हात आहे. झिव्हाला सांभळणारी केअरटेकर ही केरळची आहे. आणि तिचं झिव्हाला मल्याणम गाणी शिकवते. या मल्याणम गाण्याबरोबरच धोनीच्या लाडक्या लेकीचा चपाती लाटतानाच्या व्हिडिओनंही सोशल नेटवर्किंग साईटवर अनेक लाईक्स मिळवले. त्याबरोबरच महेंद्रसिंग धोनी आणि झिव्हाचा लाडू खातानाचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. धोनीची कन्या सध्या सोशल नेटवर्किंग कमालीची पॉप्युलर झालीय. आता झिव्हाचा आगामी काळात आणखी कुठला नवा व्हिडिओ समोर येतो याचीच उत्सुकता आता सा-यांना आहे.


ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई