मुंबई : महिला टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सोमवारपासून ३ मॅचेसच्या सीरिजला सुरुवात झाली. या मॅचमध्ये महिला टीम इंडियाचा पूजाने एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरमनप्रीत कौरच्या कॅप्टनशीपमध्ये महिला टीम इंडियाने काही खास परफॉरमन्स केला नाही. ५० ओव्हर्समध्ये संपूर्ण टीम २०० रन्सवर ऑल आऊट झाली. मात्र ९व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी उतरलेल्या पूजाने तुफानी इनिंग खेळली.


पूजा वस्त्राकरची अद्भूत इनिंग


महिला टीम इंडियाच्या पूजा वस्त्राकरने अद्भूत इनिंग खेळत टीमला लाजिरवाण्या स्थितीपासून वाचवलं आणि त्यासोबतच एक असा रेकॉर्ड आपल्या नावावर केला जो आतापर्यंत कुणीच केला नाहीये.


ऑस्ट्रेलियन बॉलरचा सामना


मिताली राजच्या अनुपस्थित टीमची धूरा हरमनप्रीत कौरकडे सोपवण्यात आली. टीमने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. मात्र, टीममधील एकाही खेळाडूला ऑस्ट्रेलियन बॉलरचा सामना करता आला नाही. 


मैदानात पूजा वस्त्राकर उतरली आणि...


ओपनर पूनम राऊतने ३७ रन्सची इनिंग खेळली मात्र, नंतर दुसऱ्या कुठल्याच खेळाडूला चांगला स्कोअर करता आला नाही. स्मृति मंधानाने १२ रन्स केले, हरमनप्रीत कौरने ९ रन्स केले. टीम इंडियाने ७ विकेट्स गमावत ११३ रन्स केले होते. त्यावेळी ९व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी मैदानात पूजा वस्त्राकर उतरली आणि तुफानी बॅटिंग केली.


पूजाने बनवला नवा रेकॉर्ड


पूजा वस्त्राकरने शानदार इनिंग खेळत फिफ्टी केली. पूजाने सुषमा वर्मासोबत मिळून आठव्या विकेटसाठी ७६ रन्सची पार्टनरशीप केली. सुषमाने ४१ रन्सची इनिंग खेळली. 


खास बाब म्हणजे या मॅचपूर्वी पूजाने आपल्या करिअरमध्ये केवळ एका मॅचमध्ये १ रन्स बनवला होता. पूजा महिला क्रिकेटमधील पहिली खेळाडू आहे जिने वन-डे क्रिकेटमध्ये ९व्या क्रमांकावर बॅटिंग करताना हाफ सेंच्युरी केली.



यापूर्वी ९व्या क्रमांकावर बॅटिंग करताना सर्वाधिक स्कोअर करण्याचा रेकॉर्ड न्यूझीलंडच्या लूसी डूलनच्या नावावर होता. लुसीने २००९ मध्ये इंग्लंडविरोधात ९व्या क्रमांकावर बॅटिंग करताना ४८ रन्स केले होते.