Mohammed Shami: शमीचं डोकं फिरलं की काय? भलतीकडेच केला थ्रो...Video पाहून तुमचाही चढेल पारा!
Mohammed Shami IND vs ENG : टीम इंडियाच्या पराभवाचं कारण काय? असा सवाल उपस्थित होत असतानाच एका व्हिडीओने प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.
Mohammed Shami fielding Video: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात दुसरा सेमीफायनल सामना खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाचा दारूण पराभव झाला. भारतीय गोलंदाजांची लाजिरवाणी कामगिरी पहायला मिळाली. भारताला इंग्लंडच्या एकाही खेळाडूला बाद करता आलं नाही. इंग्लंडने सामना 10 विकेटने जिंकला (England Beat India By 10 wickets). त्यामुळे आता क्रिडाविश्वातून टीम इंडियाला ट्रोल केलं जात आहे. टीम इंडियाच्या पराभवाचं कारण काय? असा सवाल उपस्थित होत असतानाच एका व्हिडीओने प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.
हेल्स (Alex Hales) आणि बटलरची (Jos Buttler) भागीदारी कोणत्याही गोलंदाजाला तोडता आली नाही.तसेच खराब फिल्डिंग देखील पहायला मिळाली. त्यावरून कॅप्टन रोहित (Rohit Sharma) चांगलाच भडकला होता. नवव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरही एक लाजीरवाणी गोष्ट पहायला मिळाली. 8 ओव्हरमध्ये इंग्लंडने 80 धावा चोपल्या होत्या. अशा स्थितीत भारताला विकेट काढून ही भागीदारी तोडण्याची गरज होती. पंड्याने या षटकाचा दुसरा चेंडू टाकताच बटलरने फटका मारला.
पाहा व्हिडीओ -
बटलरने चौकार खेचण्याच्या प्रयत्नात असताना लाँग लेगवर थांबलेल्या मोहम्मद शमीच्या (Mohammed Shami) दिशेने बॉल गेला. शमीने बॉल पकडला आणि न बघता त्याने दुसऱ्या फिल्डरकडे फेकला. मात्र, त्यावेळी दुसरा फिल्डर देखील तयार नव्हता. त्यामुळे बॉल पार लांब फेकला गेला. त्यावेळी बलटर आणि हेल्स जोडीने 4 धावा पळून काढल्या. त्यावेळी रोहित देखील संतापल्याचं पहायला मिळालं.
आणखी वाचा - IND vs ENG: ...म्हणून टीम इंडियाचा पराभव झाला; कॅप्टन रोहितने सांगितलं खरं कारण!
दरम्यान, हार्दिक पांड्याही (Hardik Pandya) या खराब क्षेत्ररक्षणामुळे निराश दिसला. त्यानंतर त्याने वर हात करून टाळ्या देखील वाजवल्या. त्यामुळे पांड्याचा राग पाहण्याजोगा होता. त्यानंतर फिल्डिंगचं सुमार प्रदर्शन देखील पहायला मिळालं आणि भारताचा सेमिफायनलमध्ये लाजीरवाणा पराभव झाला.