रोहित शर्माचा व्हिडिओवर नेटकरी खदा-खदा हसले, 4 सेकंदाच्या रीलवर मीम्सचा पाऊस!
Rohit Sharma Viral Video: फिल्डरची पळताभुळी थोटी केल्याशिवाय रोहितचा चैन पडत नाही. अशातच रोहित शर्माचा एक व्हिडिओ (Rohit Sharma funny Video) सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही खदाखदा हसल्याशिवाय राहणार नाही.
Rohit Sharma funny Video: रोहित शर्मा म्हणजे टीम इंडियामधील एक मजेशीर पात्र, आपल्या रावडी बोलण्यामुळे किंवा मैदानातील मस्तीमुळे रोहित (Rohit Sharma) नेहमी चर्चेचा विषय असतो. कधी कॅमेरा पकडण्याचा प्रयत्न करतो. तर कोचच्या टक्कल्याचा तबला बनवतो. एवढंच काय टीम इंडियाचा सर्वात विसरभोळा खेळाडू म्हणून देखील रोहितकडे पाहिलं जातं. कधी पार्सपोर्ट विसरतो तर कधी फोन.. पण फिल्डरची पळताभुळी थोटी केल्याशिवाय रोहितचा चैन पडत नाही. अशातच रोहित शर्माचा एक व्हिडिओ (Rohit Sharma funny Video) सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही खदाखदा हसल्याशिवाय राहणार नाही.
नेमकं काय आहे व्हिडिओमध्ये?
सध्या व्हायरल झालेला हा व्हिडिओ भारताच्या दुसऱ्या इनिंगचा आहे. त्यावेळी शुभमन गिल आणि इशान किशन मैदानात होते. भारताने दुसऱ्या डावात तोपर्यंत 2 विकेट गमावून 139 धावा केल्या होत्या. तर इशान किशन आक्रमक मोडमध्ये 18 धावांवर खेळत होता. त्याचबरोबर शुभमन गिल 21 धावा करत किशनला साथ देत होता. त्यावेळी टी-ट्वेंटीप्रमाणे आक्रमक धावा करण्याचं धोरण टीम इंडियाने आखलं होतं. त्यावेळी बोलण्यासाठी रोहित शर्माने पवेलियनची खिडकी उघडून सहकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्याचा फनी व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
आणखी वाचा - IND vs WI: ना रोहितला जमलं ना विराटला, पण आश्विनने करून दाखवलं!
व्हायरल व्हिडीओमध्ये (Rohit Sharma funny Video) रोहित खिडकीतून बाहेर डोकावताना दिसतोय. पण डोकवताना त्याचे एक्सप्रेशन्स पाहून नेटकऱ्यांना हसू अनावर झालंय. हा व्हिडीओ नेटकऱ्यांनी डोक्यावर घेतला असून अनेक मीम्स देखील तयार होत असल्याचं दिसतंय. फक्त 4 सेकंदाच्या रीलवर मीम्सचा पाऊस पडताना दिसतोय. या व्हिडीओवर गंमतीशीर प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत.
पाहा VIDEO
दरम्यान, भारताने दुसरा डाव 2 बाद 181 धावांवर घोषित केला. त्यानंतर आता वेस्ट इंडिज (West Indies) दुसरा डाव खेळत आहे. वेस्ट इंडिजने आत्तापर्यंत 76 धावा करत 2 विकेट गमावल्या आहेत. पाचव्या दिवशी वेस्ट इंडिजला सामना जिंकण्य़ासाठी आणखी 289 धावांची गरज आहे. आता तर आता पाचव्या दिवशी आणखी 8 विकेट घेऊन भारत सामन्यात मुसंडी मारणार का? असा सवाल विचारला जातोय.