Watch: ये भावा काय करू राहिलाsss, बॉल चमकवण्यासाठी Joe Root ने लढवली अनोखी शक्कल; Video तुफान व्हायरल!
Joe Root new way of shining the ball: आयसीसीच्या (ICC) नव्या नियमानुसार चेंडूवर लाळ लावण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे खेळाडू बॉल चांगला टप्प्यात पडावा यासाठी बॉलला शाईन (Ball Shine) करतात.
PAK vs ENG 1st Test: मोठा धोका पत्करत इंग्लंडचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड (Pakistan vs England) यांच्यातील पहिला कसोटी सामना रावळपिंडी (Rawalpindi) येथे खेळला जातोय. या सामन्यात इंग्लंडची चांगली पकड असल्याचं दिसतंय. सामन्या दरम्यान अनेक नवनवीन गोष्टी पहायला मिळत आहेत. अशातच आता जो रूटने (Joe Root) केलेल्या एका कृत्यामुळे नवा गोंधळ निर्माण झाला आहे.
आयसीसीच्या (ICC) नव्या नियमानुसार चेंडूवर लाळ लावण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे खेळाडू बॉल चांगला टप्प्यात पडावा यासाठी बॉलला शाईन (Ball Shine) करतात. अशातच जो रूटची नवी स्टाईल पाहून पाकिस्तानचे खेळाडू देखील शॉक झाल्याचं पहायला मिळतंय. पाकिस्ताने देखील इंग्लंडला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळे अनेकदा खेळाडूंना बॉल शाईन करावा लागतोय. पाकिस्तानच्या डावातील 72 ओव्हरमध्ये चेंडू जुना झाला होता.
आणखी वाचा - WATCH: इनस्विंग, आऊटस्विंग आणि क्लीन बोल्ड... Video पाहून तुम्हीही म्हणाल 'कडकsss'
72 व्या ओव्हरपर्यंत चेंडू जुना झाल्याने गोलंदाजांना मदत मिळत नव्हती. त्यावेळी इंग्लंडच्या जो रूटने जॅक लीचला (Jack Leach) बोलवलं आणि त्याची कॅप काढली. जो रूटने बॉल जॅक लीचच्या डोक्यावरून फिरवला. घामामुळे बॉल चमकवण्याची निराशी पद्धत पाहून पाकिस्तानच्या बाबर आझम (Babar Azam) आणि अझहर अली (Azhar Ali) देखील हसू आवरलं नाही. तर कॉमेंट्रेटर देखील खळखळून हसले.
पाहा Video -
दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (Pakistan Cricket) ऑफिशियल ट्विटर हँडलवरून (Twitter) हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. तिसऱ्या दिवस (PAK vs ENG 1st Test) अखेर पाकिस्तानने देखील इंग्लंडला दणक्यात उत्तर दिलंय. पाकिस्तानने स्कोरबोर्डवर 7 गड्यांच्या बदल्यात 499 धावा केल्या आहेत. मात्र, अजूनही पाकिस्तान 158 धावांनी पिछाडीवर आहे.