एबी डिव्हिलियर्सची पत्नी आणि शेन वॉटसनचा व्हिडिओ झाला होता व्हायरल
दक्षिण आफ्रिकेचा महान क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे.
मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा महान क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे. वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक, अर्धशतक आणि १५० रन बनवण्याचा विक्रम एबी डिव्हिलियर्सच्या नावावर आहेत. मिस्टर ३६० डिग्री नावानं ओळखल्या जाणारा एबी डिव्हिलियर्स मैदानाच्या चारही दिशांना शॉट मारण्यात पटाईत होता. एबीच्या अशा खेळामुळे बॉलरही कुठे बॉल टाकयचा याच विचारात असायचे. एबीनं वनडेमध्ये २५ शतकं आणि ५३ अर्धशतकं केली होती. एबी डिव्हिलियर्स क्रिकेटच्या मैदानात जेव्हढा आक्रमक असायचा तेवढाच रोमांच त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही होता. एबी आणि त्याची पत्नी डेनियल नेहमीच चर्चेत असतात. २०१६ सालच्या आयपीएलमध्ये एबीची पत्नी आणि ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉटसनचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.
शेन वॉटसन आणि डेनियल एका कार्यक्रमात गेले होते. या कार्यक्रमात वॉटसन गिटार वाजवत होता तर डेनियल तिच्या गोड आवाजात गाणं म्हणत होती. एबी डिव्हिलियर्सनंच हा व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये शूट केला होता.
एबीचं भारताशी खास नातं
एबीलाही भारतात राहायला आणि इथली संस्कृती जोपासायला आवडतं. म्हणूनच एबी आता त्याच्या तिसऱ्या मुलाचं नाव ताज ठेवणार आहे. २०१२ सालच्या आयपीएलमध्ये एबीनं त्याच्या बायकोला ताजमहालामध्ये प्रपोज केलं होतं. त्यामुळे ताजमहालाचं एबीच्या आयुष्यात महत्त्व आहे. एबीची तेव्हाची गर्लफ्रेंड आणि आताची बायको डॅनिलेला प्रपोज करण्यासाठी दिल्लीवरून आग्र्याला गेला होता. ताजमहालात पोहोचल्यावर एबीनं तिला लग्नाची मागणी घातली.
२०१५ साली एबी आणि डॅनिलेला पहिला मुलगा झाला. त्याचं नाव एबी ज्युनियर ठेवण्यात आलं. २०१७ साली झालेल्या दुसऱ्या मुलाचं नाव त्यांनी जॉन रिचर्ड ठेवलं. आता तिसऱ्या बाळाचं नाव ताज ठेवणार असल्याचं एबी एका मुलाखतीमध्ये म्हणाला. याआधी मला मुलाचं नाव कर्नाटक ठेवायचं होतं पण ताज हे नाव मुलासाठी ताकदवर असल्याचं एबीला वाटतंय.