Harare Hurricanes vs Cape Town Samp: ​ साल होतं 2007.. तारीख 23 सप्टेंबर, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-ट्वेंटी वर्ल्ड कप सेमीफायनलचा सामना डर्बनच्या मैदानावर खेळवला जात होता. नव्या छाव्यांची टीम इंडिया दमदार कामगिरी करत होती. खास करून सिक्सर किंग युवराज सिंह... इंग्लंडच्या गोलंदाजांचं वस्त्रहरण करत युवराजने पुढच्याच सामन्यात कांगारूंची पिसं काढली. 30 बॉलमध्ये 70 धावांची वादळी खेळी आजही सर्वांच्या डोळ्यासमोर असेल. या सामन्यात दोन गोष्टी लक्षात राहिल्या. पहिली युवीची आतिशबाजी अन् दुसरा श्रीसंतचा (S Sreesanth) जमिनीवर हात आपटणारा क्षण.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रानटी हत्तीसारखा मैदानात पाय रोवून बसलेला मॅथ्यू हेडनला श्रीसंतने क्लिन बोल्ड केलं अन् प्रत्येक भारतीयाच्या अंगावर उत्साह संचारला. हातातोंडाशी आलेला विजय भारताने गमावला असता. मात्र, श्रीसंतने घातक यॉर्कर केला अन् हेडनचा लेग स्टंग उडवला. अशातच या क्षणाची प्रचिती देणारा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. सध्य़ा झिम्बॉब्वेमध्ये सुरू असलेल्या जिम एफ्रो टी10 टूर्नामेंटमध्ये श्रीसंतने पुन्हा एकदा आपल्या भेदक यॉर्करची जादू दाखवली. त्याचा व्हिडीओ (Sreesanth bowling video viral) सध्या तुफान ट्रेंडमध्ये आहे.


नेमकं काय झालं?


श्रीसंतने टाऊन सॅम्पविरुद्धच्या (Cape Town Samp) सामन्यात अशा प्रकारे गोलंदाजी केली की चाहत्यांची मनं जिंकली आहे. झालं असं झालं की केपटाऊन सॅम्पला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 8 धावांची गरज होती. अशा स्थितीत हरारे संघाचा कर्णधार मॉर्गनने बॉल श्रीसंतकडे सोपवला. सामना आता रंगात आला होता. त्यावेळी पहिल्याच सामन्यात श्रीसंत प्रथमच गोलंदाजीसाठी आला होता. म्हणतात ना फॉर्म इस टेम्पररी बट क्लास इस परमनेंट.. अशातच श्रीसंतने शेवटच्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला विकेट काढली. शेवटच्या षटकात श्रीसंतने 7 धावा दिल्या आणि 1 विकेट काढली. अखेरच्या ओव्हरमध्ये बचाव करताना श्रीसंतने सामना सुपर ओव्हरमध्ये (super over) आणला.


पाहा Video



दरम्यान, श्रीसंतच्या या सामन्यातील भेदक गोलंदाजीमुळे सामना सुपर ओव्हरमध्ये खेळवला गेला आणि केपटाऊन सॅम्पला पराभव पत्करावा लागला. शेर भलेही कितनाही बुढा हो, शिकार करना नही भुलता, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.