VIDEO: टीम इंडियाच्या सेलिब्रेशन दरम्यान टॉवेलवर आला हा प्लेअर
ऑस्ट्रेलियाला सलग दुसऱ्या वन-डे मॅचमध्ये लोळवल्यानंतर टीम इंडियाने जबरदस्त सेलिब्रेशन केलं.
कोलकाता : ऑस्ट्रेलियाला सलग दुसऱ्या वन-डे मॅचमध्ये लोळवल्यानंतर टीम इंडियाने जबरदस्त सेलिब्रेशन केलं.
सध्या सुरु असलेल्या टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ वन-डे मॅचेसच्या सीरिजमध्ये भारताने २-० ने आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियावर विजय मिळविल्यानंतर टीम इंडियाने ड्रेसिंग रुममध्ये सेलिब्रेशन केल्याचं पहायला मिळालं. मात्र, हे सेलिब्रेशन विजयाचं नव्हतं तर मनीष पांडेच्या वाढदिवसाचं होतं.
मनीष पांडेचा वाढदिवस १० सप्टेंबर रोजी होता मात्र, टीम इंडियासोबत त्याचा वाढदिवस मॅच जिंकल्यानंतर साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त टीम इंडियाने ड्रेसिंग रुममध्ये एक सरप्राइज केक कापण्याचा कार्यक्रम ठेवला होता. हे सरप्राइज पाहिल्यानंतर मनीष पांडेलाही आश्चर्याचा धक्का बसला.
व्हिडिओत मनीष पांडेची प्रतिक्रिया पाहून वाटतं की, त्याला यासंदर्भात काहीही माहित नव्हतं. मनीष टॉवेल गुंडाळून ड्रेसिंग रुममध्ये येतो आणि त्याच दरम्यान टीम इंडियाचे प्लेयर्स त्याला पकडतात.
त्यानंतर मनीष पांडे केक कापतो आणि मग इतर प्लेयर्स तो केक त्याच्या चेहऱ्याला लावतात. या दरम्यान महेंद्र सिंग धोनी सोफ्यावर बसून हसत होता.