Azhar Ali duck on his last test Innings: पाकिस्तानचा स्टार फलंदाज अझहर अली याने (Azhar Ali) शुक्रवारी पत्रकार परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर (Azhar Ali Announces Retirement) केली. इंग्लंडविरुद्ध कराची येथे खेळला जाणारा तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना (PAK vs ENG) हा आपल्या कारकीर्दीतील अखेरचा सामना असेल, असं अझहर अली म्हणाला होता. त्यानंतर सध्या सुरू असलेल्या सामन्यात अझहर अलीला पाकिस्तानी टीमकडून 'गार्ड ऑफ ऑनर' देण्यात (Guard Of Honour) आला. त्यानंतर त्याचे डोळे पाणावल्याचं दिसून आलं. (England and Pakistan win hearts with awe inspiring gestures after Azhar Ali finishes Test career with a duck marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात (PAK vs ENG) अझहर अली फलंदाजीला आला तेव्हा फिरकीपटू जॅक लीच (Jack Leach) गोलंदाजी करत होता. तीन बॉल खेळवल्यानंतर जॅक लीचने आपला हुकमी एक्का लेग स्पीन बॉल काढला आणि अझहर अलीची विकेट काढली. इंग्लंडच्या खेळाडूंनी खूप सेलेब्रेशन केलं नाही. 


आणखी वाचा - BCCI ॲक्शन मोडमध्ये; रोहित - राहूल टी-20 संघातून OUT?


विकेट काढल्यानंतर जॅक लीचने (Jack Leach Bowled Azhar Ali) स्वत: पुढाकार घेतला आणि अजहर अलीच्या पाठीवर कौतूकाची थाप दिली. त्यानंतर अझहरचे डोळे पाणावल्याचं (Azhar Ali Emotional) दिसून आलं. त्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी अझहरचं कौतूक करत त्याला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी मैदानात उभं राहून टाळ्यांचा कडकडाट केला. त्यानंतर पाकिस्तानचे खेळाडू पळत आले आणि त्यांनी बॉट उंचावत अझहर अलीला 'गार्ड ऑफ ऑनर' दिला.


पाहा Video - 



दरम्यान, अझहर अलीने पाकिस्तानसाठी 96 कसोटी सामने खेळले आहेत. यावेळी त्याने 42.5 च्या सरासरीनं 7,097 धावा केल्या आहेत. तर अझहरनं कसोटीत 19 शतकं आणि 35 अर्धशतकं झळकावली आहेत. 3 वेळा कसोटी सामन्यात दुहेरी शतक ठोकण्याचा पराक्रम देखील अझहरने केला आहे. कसोटीसह त्याने वनडे सामन्यात देखील 53 सामने खेळले आहेत. त्यात त्याचे 3 सेच्यूरी आणि 12 हाफ सेच्यूरीचा समावेश आहे.