Australia vs South Africa, 1st Test: ऑस्ट्रेलिया (Australia) आणि साऊथ अफ्रिका (South Africa) यांच्यात ब्रिस्बेनमध्ये पहिला कसोटी सामना खेळला (AUS vs SA 1st Test) जात आहे. आगामी आयसीसीच्या टेस्ट वर्ल्ड कप फायनलमध्ये जाण्यासाठी (ICC Test World Cup) आता दोन्ही संघ धडपड करताना दिसत आहे. अशातच आता ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकून (Australia beat South Africa) विजयी आघाडी घेतल्याने आता ऑस्ट्रेलियाची आगामी वाटचाल सोपी झाल्याचं पहायला मिळतंय. (watch video Mitchell Starc Clean bold van der Dussen with charismatic ball surprised cricket australia vs south africa 1st test marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलिया आणि साऊथ अफ्रिकेत (Australia vs South Africa, 1st Test) सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी कॅप्टनचा निर्णय बरोबर ठरवत अफ्रिकेचा संघ 152 धावांवर तंबूत परतवला. विकेटकिपर व्हेरीनला (Verreynne) वळगता कोणालाही मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. व्हेरीनच्या 64 धावांमुळे साऊथ अफ्रिकेला 152 धावांचं आव्हान उभं करता आलं. त्यानंतर आता 153 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया (Australia) संघाने 218 धावा केल्या. त्यानंतर 99 धावांवर साऊथ अफ्रिकेचा डाव गुंडाळत ऑस्ट्रेलिया आरामात सामना जिंकला.


आणखी वाचा -Australia vs South Africa: दोन सेकंदात खेळ खल्लास... कॅच पाहून वॉर्नरही झाला शॉक; डोळ्याचं पारणं फेडणारा Video


स्टार्कने (Mitchell Starc 300 wicket) आपल्या कसोटी कारकिर्दीत 300 बळीही पूर्ण केले. इतकंच नाही तर दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) डावात स्टार्कने रॅसी व्हॅन डर ड्युसेनला (van der Dussen) ज्या पद्धतीने बॉलिंग केली ते पाहण्यासारखं होतं. स्टार्कने (Mitchell Starc) पहिले काही चेंडू ऑफला खेळवले. त्यामुळे फलंदाज रिलॉक्स दिसत होता. त्याचवेळी स्टार्कने पुर्ण ताकदीने यॉर्कर गोलंदाजी करत ड्युसेनला दणका दिला.


पाहा Video - 



दरम्यान, स्टार्कने (Mitchell Starc Clean bold van der Dussen) टाकलेल्या बॉलवर ड्युसेनने प्लेस करण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्टार्कच्या बॉलने थेट स्टंप्सची (Stumps) गळाभेट घेतली. स्टार्कने ड्युसेनला टाकलेला बॉल पाहून अनेकांना धक्का बसलाय. ड्युसेन देखील गोलंदाजी पाहून शॉक राहिला. त्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे.