Video: `या` गोलंदाजाने सचिन तेंडुलकरला Out केलं कोणाचा विश्वासच बसेना; स्वत: सचिनही थक्क
Watch Video Sachin Tendulkar Wicket: शतकांचं शतक झळकावणारा, जगातील कोणत्याही गोलंदाजीची पिसं काढण्याचं सामर्थ्य आजही असलेला सचिन तेंडुलकर या खेळाडूच्या गोलंदाजीवर बाद झाला यावर अनेकांचा विश्वास बसत नाहीये.
Watch Video Sachin Tendulkar Wicket: आपल्या कौशल्यपूर्ण फलंदाजीने अगदी कोणत्याही गोलंदाजीची पिसं काढण्याचं समार्थ्य असलेल्या मोजक्या क्रिकेटपटूंमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा समावेश होता. 3 दशकं अंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या सचिनने कोट्यवधी भारतीय चाहत्यांना अविस्मरणीय आठवणी दिल्या. सचिनने त्याच्या कारकिर्दीमध्ये अनेक विक्रम आपल्या नावे करुन घेतले आहेत. यापैकी बरेसचे विक्रम कधी मोडलेही जाणार नाहीत एवढे खास आहेत. निवृत्तीनंतर सचिन वेगवेगळ्या कारणांसाठी आयोजित केलेल्या विशेष सामन्यांमध्ये खेळताना दिसतो. अशाच एका सामन्यात बुधवारी सचिन खेळताना दिसला.
जे घडलं त्यावर अनेकांना विश्वास बसेना
ठाण्यातील दादोजी कोंडदेव मैदानात आयोजित करण्यात आलेल्या 'इंडियन स्ट्रीट प्रिमिअर लीग'च्या सामन्यात सचिन तेंडुलकर सहभागी झाला होता. ही एक टी-10 क्रिकेट मालिका आहे. करिना कपूर खान, सैफ अली खान, अमिताभ बच्चन यासारखे सेलिब्रिटी या स्पर्धेतील संघांचे मालक आहेत. त्यामुळे या स्पर्धेला आधीपासूनच ग्लॅमरचा तडका मिळाला आहे. याच स्पर्धेमध्ये आयोजित केलेल्या एका मैत्रीपूर्ण सामन्यामध्ये असं काही घडलं आहे की अनेकांचा त्यावर विश्वास बसत नाहीये.
सचिन विरुद्ध अक्षय कुमार समाना
'इंडियन स्ट्रीट प्रिमिअर लीग'च्या या मैत्रीपूर्ण सामन्यात सचिन तेंडुलकर, रॉबीन उथप्पा, सुरेश रैना, इरफान पठाण, अक्षय कुमार यासारखे सेलिब्रिटी सहभागी झाले होते. सचिन तेंडुलकर कर्णधार असलेल्या मास्टर्स 11 आणि अक्षय कुमार कर्णधार असलेल्या खिलाडी 11 या दोन संघांदरम्यान मैत्रीपूर्ण सामना खेळवण्यात आला. सचिन तेंडुलकरला या सामन्यामध्ये बिग बॉस 17 चा विजेता असलेला स्टॅण्डअप कॉमेडियन मुनव्वर फारुखीने बाद केलं.
सचिनची अनपेक्षित विकेट
सचिन तेंडुलकर 5 व्या षटकामध्ये 16 चेंडूंमध्ये 30 धावांवर फलंदाजी करत असताना मुनव्वरच्या चेंडूवर उंच फटका मारण्याच्या नादात चेंडू बॅटच्या वरच्या बाजूला लागून जागेवर उडाला. हा झेल फिल्डरने बरोबर टीपला आणि लोकांना जे घडलं त्यावर विश्वासच बसत नव्हता. मुनव्वर फारुखीने चक्क सचिन तेंडुलकरची विकेत घेतली होती. ही विकेट पाहून समालोचकाच्या 'मैदानात चिडीचूप शांतता पसरली आहे,' या वाक्यावरुनच ही विकेट किती आश्चर्यचकित करणारी होती हे स्पष्ट केलं. सचिनच्या या विकेटचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. आपली विकेट अशापद्धतीने आपण मुनव्वरला भेट दिल्याचं पाहून सचिनला स्वत:लाही बाद झाल्यानंतर थक्क होऊन चेहऱ्यावर आलेलं हसू रोखता आलं नाही. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...
माझा विश्वास बसत नाहीये की सचिन मुनव्वरकडून बाद झाला
सचिनला मुनव्वरने बाद केलं
मूळ धडे गिरवा
या सामन्यानंतर बोलताना सचिन तेंडुलकरने खेळाडूंन रणजी सारख्या स्पर्धा खेळून क्रिकेटचे मूळ धडे गिरवणे आवश्यक असल्याचं म्हटलं आहे.