हार्दिकसमोर कोहलीची माकडचेष्ठा, पांड्याला खिजवत विराटचा भन्नाट डान्स; पाहा Video
Virat Kohli funny Video: मैदानावर खेळणं असो किंवा सराव सत्र असो. कोहलीची खिल्ली उडवण्याची शैली नेहमीच मजेशीर असते. सध्या ट्रेंड होत असलेल्या व्हिडिओमध्ये कोहली नेटमध्ये हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) गोलंदाजीचा सामना करत आहे.
Virat Kohli dance Video in Nets: आग लगे बस्ती में, कोहली अपनी मस्ती में... ही ओळ गेल्या काही वर्षात चांगलीच प्रचलित झाल्याचं दिसून येतंय. सामन्यात कितीही प्रेशर परिस्थिती असो, कोहली मस्ती करणं कधी सोडत नाही. विराट कोहली ( Virat Kohli ) आपल्या खेळाचा पुरेपूर आनंद घेतो. त्याचे डान्स (Virat Kohli Dance) करतानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच कोहलीचा एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातल असल्याचं पहायला मिळतंय.
मैदानावर खेळणं असो किंवा सराव सत्र असो. कोहलीची खिल्ली उडवण्याची शैली नेहमीच मजेशीर असते. वेस्ट इंडिजविरुद्धची वनडे मालिका सुरू होण्यापूर्वीही कोहलीची हीच शैली पाहायला मिळाली होती. आता विराटच्या माकडचेष्ठेचा शिकार झालाय हार्दिक पांड्या (Hardik Pandya)... भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा सामना (IND vs WI 2nd odi) खेळवण्यापूर्वी टीम इंडियाचे फलंदाज नेट्समध्ये सराव करताना दिसत आहेत. याचवेळीचा एक व्हिडिओ (Virat Kohli funny Video) समोर आला आहे.
सध्या ट्रेंड होत असलेल्या व्हिडिओमध्ये कोहली नेटमध्ये हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीचा सामना करत आहे. कोहलीने हार्दिकचा बॉल खेळला पण त्यानंतर हार्दिक पांड्याने कोहलीला नाजूक खुन्नस दिली. त्यानंतर विराटने जे काही केलं ते पाहून तुम्हीही खदाखदा हसल्याशिवाय राहणार नाही. विराटने हार्दिकला (Hardik Pandya) वाकडं दाखवत खिजवलं. त्यानंतर हार्दिकला देखील हसू फुटलं. त्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
पाहा Video
दरम्यान, काही दिवसांपूर्वी टेस्ट मॅच सुरू असताना विराट कधी डीआरएस घेतानास खदकन हसताना दिसतोय तर कधी भर मैदानात झोपण्याची नाटकी करताना दिसतोय. तर कधी पंजाबी गाण्यावर ठुमके लगाताना दिसला होता. त्याचा व्हिडिओ देखील तुफान व्हायरल झाल्याचं दिसलं होतं. अशातच आता विराट कोहलीच्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.
दुसऱ्या सामन्यासाठी संभाव्य Playing XI
वेस्ट इंडिज : शाई होप (कॅप्टन आणि विकेटकीपर), कायले मेयर्स, ब्रँडन किंग, अॅलिक अथानाझे, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कॅरिया, डॉमिनिक ड्रेक्स, जेडेन सील्स आणि गुडाकेश मोती.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक आणि मुकेश कुमार.