पोर्ट ऑफ स्पेन :  आपण हेलिकॉप्टर शॉट म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर महेंद्रसिंग धोनी येतो.  या शॉर्टसाठी पॉवर, बॅटस्पीड, तंत्र आणि परफेक्ट टायमिंगची गरज असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक क्रिकेटरने भारताच्या माजी कर्णधाराचा हा शॉर्ट मारण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना काही जमलं नाही. पण भारताचा कर्णधार विराट कोहलीनी तसाच काहीसा हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न केला आहे. 


वेस्ट इंडिज विरूद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात ३८ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर विराटने एक सिक्सर लगावला. कोहलीचा हा शॉर्ट हेलीकॉप्टर शॉर्ट सारखा दिसत नसला तरी त्याचा अंतीम परिणाम सिक्सर होता. 


विराटचा सिक्सर पाहा व्हिडिओमध्ये २.१० मिनिटांनी...