Washington Sundar Catch : वॉशिंग्टनकडून न्यूझीलंडचा परफेक्ट कार्यक्रम, टप्प्यात घेत किवींच्या केल्या बत्त्यागुल
वॉशिंग्टन सुंदरने अप्रति गोलंदाजी केली आणि मार्क चॅपमॅन सलग तीन चेंडू निर्धाव टाकले त्यानंतर आपल्याच गोलंदाजीवर त्याने जबरदस्त झेल घेतला.
Washington Sundar Catch : भारत आणि न्यूझीलंडमधील पहिला सामना रांचीच्या JSCA आंतरराष्ट्रीय स्टेडियमध्ये सुरू आहे. भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. न्यूझीलंडकडून सलामीला फिन ऍलन आणि डेव्हॉन कॉनवे आले होते. ऍलनने त्याच्या स्टाईलमध्ये बॅटींग करायला सुरूवात केली. परंतु त्याला युवा खेळाडू वॉशिंग्टन सुंदरने माघारी पाठवलं. त्यानंतर आलेल्या मार्क चॅप्मनला टप्प्यात घेत त्याचा कार्यक्रम केला. अप्रतिम कॅच घेत सुंदरने चॅप्मनला भोपळाही फोडू न देता बाद केलं.
पहिली ओव्हर हार्दिक पांड्याने टाकली यामध्ये त्याच्यावर ऍलनने आक्रमण करत 11 धावा काढल्या. दुसरी ओव्हर अर्शदीप सिंह टाकत होता त्यालाही 12 धावा वसुल केल्या. आता न्यूझीलंड पॉवरप्लेमध्ये मोठी धावसंख्या उभारणार असं वाटत होतं. मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये आलेल्या वॉशिंग्टनने चिवट गोलंदाजी करत अवघ्या 3 धावा देत धावगतीला ब्रेक लावला.
अर्शदीपच्या चौथ्या ओव्हरमध्ये ऍलनने चौकार, षटकार मारले. पांड्याने पाचवी ओव्हर पुन्हा वॉशिंग्टन सुंदरकडे दिली. ऍलनने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला, दुसऱ्या चेंडूवरही मोठा फटका मारला पण बाऊंड्री लाईनवर सूर्य कुमारने कॅच पकडला. त्यानंतर आलेल्या मार्क चॅप्मनलाही सुंदरने आपल्या जाळ्यात अडकवलं. वॉशिंग्टन सुंदरने अप्रति गोलंदाजी केली आणि मार्क चॅपमॅन सलग तीन चेंडू निर्धाव टाकले त्यानंतर आपल्याच गोलंदाजीवर त्याने जबरदस्त झेल घेतला.
दरम्यान, न्यूझीलंडने भारतीय संघाला विजयासाठी 177 धावांचं आव्हान दिलं आहे. डेव्हॉन कॉनवेने 52 धावांची आक्रमक खेळी केली. यामध्ये 7 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. त्यानंतर डॅरिल मिशेलने आक्रमक पवित्रा घेत अवघ्या 30 चेंडूत त्याने नाबाद 59 धावा करत न्यूझीलंड संघाला 170 धावांचा टप्पा पार करून दिला. भारताला 178 धावांचं आव्हान आहे.