विम्बल्डन : धक्कादायक निकाल, स्वित्झर्लंडच्या स्टानिसलासचा पराभव
विम्बल्डनमध्ये पहिल्या धक्कादायक निकालाची नोंद झालीय़. स्वित्झर्लंडच्या पाचव्या मानांकित स्टानिसलास वावरिंकाला पहिल्याच राऊंडमधून एक्झिट घ्यावी लागली.
लंडन : विम्बल्डनमध्ये पहिल्या धक्कादायक निकालाची नोंद झालीय़. स्वित्झर्लंडच्या पाचव्या मानांकित स्टानिसलास वावरिंकाला पहिल्याच राऊंडमधून एक्झिट घ्यावी लागली.
त्याला रशियाच्या डॅनिअल मेदवेदेवनं 6-4 3-6 6-4 6-1 नं पराभवाचा धक्का दिला. तीन ग्रँडस्लॅम जिंकणा-या वावरिंकाला पराभूत करण्यासाठी त्याला 2 तास 12 मिनिटं लांगली.
आपलं पहिलचं विम्बल्डन खेळणा-या मेदवेदेवनं आपल्या पावरफुल सर्व्हिसनं वावरिंकावर मात केली. मेदवेदेवच्या धडाक्यासमोर वावरिंकाचं काहीचं चाललं नाही. आणि त्याला पहिल्याच राऊंडमध्ये गाशा गुंडाळावा लागला.