प्लेऑफसाठी काहीही? रोहित शर्माने बोलून दाखवली उपकाराची भाषा; पाहा काय म्हणाला...
IPL 2023 Playoff Scenarios: मुंबई आणि हैदराबाद (MI vs SRH) सामन्यात कॅमरून ग्रीनने 47 चेंडूत नाबाद शतक ठोकलं. तर कॅप्टन रोहितने (Rohit Sharma) देखील फिफ्टी झळकावली. सामना तर मुंबईने जिंकलाय, पण त्यानंतर रोहित जे काही बोलला, त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Rohit Sharma On RCB: मुंबई इंडियन्स आणि सनराईजर्स हैदराबाद (Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad) यांच्यात झालेल्या सामन्यामध्ये मुंबईने 8 विकेट्स आणि 12 चेंडू राखून विजय नोंदवला आहे. हैदराबादचा पराभव करत मुंबईने प्लेऑफचं (IPL 2023 Playoffs) आव्हान जिवंत ठेवलंय. या सामन्यात कॅमरून ग्रीनने 47 चेंडूत नाबाद शतक ठोकलं. तर कॅप्टन रोहितने (Rohit Sharma) देखील फिफ्टी झळकावली. सामना तर मुंबईने जिंकलाय, पण त्यानंतर रोहित जे काही बोलला, त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
काय म्हणाला Rohit Sharma?
आम्हाला जिंकायचं होतं आणि इतरत्र काय होईल याची चिंता करू नये, अशी मानसिकता आम्ही घेऊन आलो होतो. आपण काय नियंत्रित करू शकता आणि नंतर सर्वोत्तम खेळाची आशा करू शकता, असं रोहितने विजयानंर म्हटलं आहे. कोणाशीही बोललो नाही. हंगामातील आमच्या खराब कामगिरीस आम्ही स्वतःच दोषी आहोत. जर आम्ही प्लेऑफमध्ये गेलो तर मी सर्व श्रेय खेळाडूंना देईन, असंही रोहित म्हणाला.
गेल्या वर्षी आम्ही आरसीबीवर एक मोठा उपकार केला होता. आम्हाला आशा आहे की निकाल आमच्या बाजूने लागेल, असं म्हणत रोहितने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. आम्ही जाताना बर्याच गोष्टी बरोबर केल्या नाहीत. आमची सुरुवात चांगली झाली नाही आणि त्यानंतर आम्ही तीन विजय मिळवले.
पंजाबविरुद्धच्या सामन्यात आम्हाला 18 चेंडूत 34 धावांची गरज होती, आम्ही कदाचित चांगले खेळू शकलो असतो. तसेच लखनऊ विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात डावाच्या पूर्वार्धानंतर खेळ आमच्या हातात होता. आम्ही त्याकडे जास्त लक्ष देऊ शकत नाही, असं म्हणत रोहितने नाराजी व्यक्त केली आहे.
आणखी वाचा - MI Vs SRH : प्लेऑफच्या दिशेने मुंबईला 'ग्रीन' सिग्नल; हैदराबादचा 8 विकेट्सने पराभव
दरम्यान, मुंबईच्या विजयामुळे आता संघाचे 14 सामन्यात 16 गुण झाले आहेत. मात्र त्यांचे नेट रनरेट हे -0.044 आहे. त्यामुळे आता आजच्या सामन्यात गुजरातचा विजय मुंबईला प्लेऑफमध्ये पोहोचवू शकतो. जर आरसीबी सामना जिंकली तर थेट प्लेऑफचा पल्ला आरसीबीने गाठलाय.