पुणे : न्यूझीलंडविरुद्धची दुसरी वनडे भारतानं ६ विकेट्सनं जिंकली. या विजयाबरोबरच भारतानं ३ वनडे मॅचच्या सीरिजमध्ये कमबॅक केलं. न्यूझीलंडनं मुंबईतली वनडे जिंकल्यानंतर सीरिजमधलं आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला दुसरी वनडे जिंकणं आवश्यक होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय बॉलर्सच्या चमकदार कामगिरीमुळे न्यूझीलंडला ५० ओव्हरमध्ये २३० रन्सपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून भुवनेश्वर कुमारनं सर्वाधिक 3 विकेट घेतल्या तर बुमराह आणि युझुवेंद्र चहलला प्रत्येकी दोन विकेट मिळाल्या. हार्दिक पांड्या आणि अक्सर पटेलला प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश आलं.


भारताच्या या विजयाचं श्रेय कॅप्टन विराट कोहलीनं दोन खेळाडूंना दिलं आहे. भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह आमच्या ताफ्यातील दोन अस्त्र आहेत. हे दोघं भारतासाठी महत्त्वाचे बॉलर्स आहेत, त्यांच्याबरोबरच मी रणनिती बनवतो, अशी प्रतिक्रिया विराट कोहलीनं दिली आहे.


सामना जिंकल्यानंतर कोहलीने टॉस हरण्याबाबत महत्त्वाचे विधान केले. विराट म्हणाला, जेव्हा आम्ही टॉस हरलो आणि न्यूझीलंडने बॅटिंगचा निर्णय घेतला तेव्हाच आम्ही जिंकलो होतो. खेळ जसजसा पुढे सरकेल तसतशी खेळपट्टी धीमी होत जाईल आणि रात्रीच्या वेळेस या खेळपट्टीवर चांगल्या धावा करता येतील हे मला माहीत होते, असं कोहली म्हणाला आहे.