मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये शेवटचा पाचवा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात आंतरराष्ट्रीय सामन्यातून निवृत्ती घेतलेल्या धोनीचा फिव्हर दिसुन आला आहे. त्यामुळे खुप वर्षानंतर विदेशात पुन्हा एकदा धोनीला चिअर करणारे बॅनर्स पाहण्याचा योग आला. त्यामुळे महेंद्र सिंह धोनीचे चाहते सुखावले आहेत.  
 
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन जवळपास दोन वर्षे झाली आहेत. मात्र चाहत्यांमध्ये त्याची क्रेझ अजूनही कमी झालेली नाही. ही क्रेझ भारतातच नाही तर परदेशातही आहे.भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या 5व्या कसोटीदरम्यान, चाहत्यांचा एक गट महेंद्रसिंग धोनीच्या पोस्टरसह दिसला. धोनीच्या फोटोसह पोस्टरवर 'वुई मिस यू एमएसडी' असे लिहिले होते. धोनीची ही फॅन फॉलोइंग बघून अजून आनंद होतोय.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचा पहिला डाव
कसोटी सामन्यात भारताची प्रथम फलंदाजी आहे. मात्र या सामन्यात भारताची सुरुवात चांगली झाली नाही आहे. शुभमन गिल (17), चेतेश्वर पुजारा (13), हनुमा विहारी (20) आणि विराट कोहली (11) श्रेयस अय्यर (15) धावावर बाद झाले आहेत. तर ऋषभ पंत आणि जाडेजाने पहिल्या डावाचा खेळ सावरला आहे. पंतने अर्धशतक ठोकलंय, तर जाड़ेजाही अर्धशतकानजीक आहे. दोघांनी मिळून डाव सावरून 200 धावापर्यंत स्कोर पोहोचवलाय. 


या सामन्याची दोन्ही संघाच्या चाहत्यांना उत्सुकता आहे. कारण या सामन्यात टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.