Rohit Sharma: आम्ही मैदानावर मजा करत...; सलग नवव्या विजयानंतर रोहित शर्माचं अजब विधान
Rohit Sharma : नेदरलँड्सविरूद्धच्या विजयानंतर रोहित शर्मा म्हणाला, जेव्हापासून आम्ही वर्ल्डकप खेळायला सुरुवात केली, तेव्हापासून आमच्यासाठी एकावेळी एकच सामन्याचा विचार होता.
Rohit Sharma : वर्ल्डकपमध्ये लीग स्टेजचे सामने आता संपले आहेत. लीग स्टेजच्या अखेरच्या सामन्यात टीम इंडियाने नेदरलँड्सचा 160 रन्सने पराभव केला आहे. बंगळूरूच्या चिन्नस्वामी स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत नेदरलँड्सला 411 रन्सचं टारगेट दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना डचच्या टीमला 250 रन्सपर्यंत मदल मारता आली. टीम इंडियाचा हा सलग नववा विजय असून टीमचा कर्णधार रोहित शर्मा खूप खूश दिसत होता.
सलग नवव्या विजयानंतर काय म्हणाला रोहित शर्मा?
नेदरलँड्सविरूद्धच्या विजयानंतर रोहित शर्मा म्हणाला, जेव्हापासून आम्ही वर्ल्डकप खेळायला सुरुवात केली, तेव्हापासून आमच्यासाठी एकावेळी एकच सामन्याचा विचार होता. या स्पर्धेदरम्यान आम्ही कधीही फार पुढे जाण्याचा विचार केला नाही. ही एक मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेदरम्यान आम्हाला वेगवेगळ्या परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागत असून मी तेच केलं.
या नऊ सामन्यांमध्ये आम्ही ज्या प्रकारे खेळलो त्यामुळे मी फार खूश आहे. पहिल्या सामन्यापासून ते आजच्या गेमपर्यंत आम्ही अतिशय चांगली कामगिरी दिली. कारण वेगवेगळ्या सामन्यांमध्ये विविध खेळाडूंनी कामगिरी केलीये. आम्हाला ही परिस्थिती माहित आहेत, परंतु जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या विरोधी टीमसोबत खेळता तेव्हा ते एक वेगळं आव्हान असतं, असंही रोहितने म्हटलंय.
रोहित पुढे म्हणाला, भारतीय क्रिकेट समर्थकांच्या आमच्याकडून खूप अपेक्षा असणार आहे. आम्हाला सर्वकाही बाजूला ठेवून हातातील कामावर लक्ष केंद्रित करायचंय आहे. आम्हाला मैदानावर खूप मजा करून खेळायचं होतं आणि त्याचा परिणाम सध्या आमच्या कामगिरीवरही दिसून येतोय.
न्यूझीलंडशी होणार सेमीफायनलचा सामना
टीम इंडिया 2023 च्या वर्ल्डकप स्पर्धेच्या सेमीफायनल सामन्यासाठी अव्वल टीम म्हणून पात्र ठरलीये. टीम इंडियाला वर्ल्ड कप 2023 मधील सेमीफायनल सामना 15 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध खेळावा लागणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियाला वर्ल्ड कप 2023 चा सेमीफायनल मॅच जिंकून वर्ल्ड कप 2023 च्या फायनल मॅचसाठी पात्र होऊ शकतो.