मुंबई : गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माच्या लग्नाबाबत जोरदार चर्चा रंगली होती. पण ही अफवा असल्याचीही एक चर्चा होत होती. मात्र आता ही अफवा नसून खरी बातमी ठरली आहे. विराट-अनुष्काने इटलीमध्ये लग्न केलं आहे. ते आता ऑफिशिअलही जोडीदार झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोघांनाही क्रिकेट आणि बॉलिवूड विश्वातील अनेक दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अनेकांनी ट्विट करून तर अनेकांनी फेसबुकवरून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 











दोघांनीही लग्नाचे फोटो ट्विटरवर शेअर करून याचा खुलासा केलाय. तोपर्यंत केवळ अंदाज बांधले जात होते. एका खाजगी समारंभात हा लग्न सोहळा पार पडला. विराट आणि अनुष्काच्या जवळले काही लोकच या सोहळ्याचा उपस्थित होते.