एक रनवर 8 विकेट, 7 फलंदाज 0 वर आउट, या ऑस्ट्रेलिया टीम सोबत हे काय झालं
ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत सामन्यांच्या सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एका वनडे चषक अंतर्गत हा सामना खेळवला गेला होता. यात तस्मानियाने 55 धावा करून सामन्यात विजय मिळवला.
Cricket : जर कोणत्या संघात 11 आंतरराष्ट्रीय खेळाडू असतील आणि त्यांची तिसरी विकेट 52 धावांवर पडली, त्यानंतर जर त्या संघाच्या फलंदाजांना केवळ 1 धाव करण्यासाठी जर 10 विकेट्स गमवाव्या लागल्या तर सर्वांना आश्चर्य वाटेल. पण ही परिस्थिती काल्पनिक नाही तर असे घडले ऑस्ट्रेलियाच्या एका सामन्यात ज्यात एका संघात तब्बल 11आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले खेळाडू होते. या सामन्यात ज्या संघाची अवस्था झाली त्या संघात जोश इंग्लिश, कॅमरून बॅनक्रॉफ्ट, डार्सी शॉट आणि जे. रिचर्डसन असे स्टार खेळाडू होते.
संबंधित सामना हा वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि तस्मानिया यांच्यात पार पडला. या सामन्यात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने पहिले फलंदाजी करून इनिंगला सुरुवात केली. आरोन हार्डी (7) आणि डार्सी शॉट (22) ने पहिल्या विकेटसाठी 11 धावांची भागीदारी केली. यानंतर दुसऱ्या विकेटसाठी कॅमरून बॅनक्रॉफ्ट आणि शॉर्टने 33 धावांची भागीदारी केली. कॅमरुनने 14 धावांची खेळी केली आणि शॉर्टनंतर दोन अंकी धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरला.
वेस्टर्न ऑस्ट्रेलियाची तिसरी विकेट ही 52 धावांवर पडली आणि कॅमरून बॅनक्रॉफ्ट बाद झाला. याशिवाय कर्णधार एश्टन टर्नर, कूपर कॉनॉली, हिल्टन कार्टराइट, एश्टन एगर, जे. रिचर्डसन, जोएल पेरिस आणि लांस मोरिस एकही धाव न करता बाद झाले. तस्मानियासाठी सर्वाधिक विकेट बीयू वेबस्टरने घेतल्या त्याने 17 धावा देऊन 6 विकेट्स घेतल्या. तर बिली स्टेनलेकने 3 विकेट घेतले. तर टॉम रॉजर्सने एक विकेट घेतली.
तस्मानियाने 55 धावा करून सामन्यात विजय मिळवला. यासाठी मिचेल ओवेनने 29 धावांची तर मैथ्यू वेडने 21 धावांची खेळी केली. विजयाचे आव्हान पूर्ण करताना तस्मानियाच्या 3 विकेट पडल्या होत्या. ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत सामन्यांच्या सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एका वनडे चषक अंतर्गत हा सामना खेळवला गेला होता.