Rahkeem Cornwall: 140 किलोच्या या क्रिकेटरने T20 सामन्यात ठोकलं दुहेरी शतक, सिक्सचा पाऊस
या क्रिकेटरने टी20 क्रिकेटमध्ये बुधवारी 43 बॉलमध्ये 205 रनची दमदार खेळी केली.
मुंबई : क्रिकेटच्या सामन्यात अनेक रेकॉर्ड बनवले जातात आणि मोडले ही जातात. पण पहिल्यांदा कारनामा करणाऱ्यांचं नाव सगळेच जण नेहमीच लक्षात ठेवतात. क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये जेव्हा एखादा विशेष खेळाडू मैदानावर उतरतो तेव्हा त्याची कामगिरी पाहण्यासाठी उत्सूकता दिसून येते. 6.6 फूट उंच रहकीमची खेळी पाहून देखील क्रिकेट चाहत्यांचं जबरदस्त मनोरंजन झाले. कारण अटलांटा फायर टीमने स्क्वायर ड्राइव्हचा तब्बल 172 धावांनी पराभव केलाय. रहकीम कॉर्नवाल (Rahkeem Cornwall) याने 3 वर्षापूर्वी भारतीय संघाच्या विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू केले होते.
वेस्टइंडिजचा ऑलराउंडर रहकीम कॉर्नवालने (Rahkeem Cornwall) टी20 क्रिकेटमध्ये बुधवारी इतिहास रचला. त्याने अमेरिकेत झालेल्या अटलांटा ओपन टी20 लीगमध्ये दुहेरी शतक ठोकलं. 29 वर्षाच्या कॉर्नवालने 43 बॉलमध्ये 17 फोर आणि 22 सिक्स ठोकले. यासह त्याने 205 रनची दमदार खेळी खेळली. रहकीम सध्या सर्वात वजनदार क्रिकेटर मानला जातो. कॉर्नवालचं वजन 140 किलो आहे. (Rahkeem Cornwall weight)
कॉर्नवाल डेब्यू सामन्यात आपल्या वजनामुळे अधिक चर्चेत राहिला. कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL) मध्ये तूफानी खेळीनंतर त्याला राष्ट्रीय संघात स्थान मिळालं आहे. कार्नवालने आपल्या करिअरमध्ये 9 टेस्ट सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने 238 रन सह 34 विकेट घेतल्या आहेत. अटलांटा फायरने (Atlanta fire) 20 ओव्हरमध्ये एक विकेट गमवून 326 रन केले होते. कॉर्नवाल शिवाय स्टीवन टेलरने 18 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 5 फोरच्या मदतीने 53 रनची खेळी केली. समी असलमने 29 बॉलमध्ये 53 रन केले.
स्क्वायर ड्राइव्हला 327 रनचं टार्गेट मिळालं होतं. 20 ओव्हरमध्ये ते फक्त 154 रन करु शकले. स्क्वायर ड्राईव्हसाठी यशवंत बालाजीने 38 आणि वरुण साई मंथाने 36 रन केले. कार्नवालने इनिंगच्या शेवच्या बॉलवर सिक्स मारत आपले दुहेरी शतक पूर्ण केलं. टी20 वर्ल्डकपसाठी त्याला भारतीय संघात स्थान मिळालेलं नाही.