मुंबई : भारत दौऱ्यासाठी वेस्ट इंडिजच्या टेस्ट टीमची घोषणा झाली आहे. वेस्ट इंडिजच्या या टीममध्ये क्रिस गेल, ड्वॅन ब्राव्हो आणि सुनिल नारायण या दिग्गज खेळाडूंना वेस्ट इंडिजच्या टीममध्ये स्थान मिळालं नाही. वेस्ट इंडिजची टीम ऑक्टोबर महिन्यामध्ये भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यामध्ये भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये २ टेस्ट ५ वनडे आणि ३ टी-२० मॅच होणार आहेत. ४ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबरपर्यंत हा दौरा चालेल. वेस्ट इंडिजनं वनडे आणि टी-२० सीरिजसाठीची टीम घोषित केलेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

११ सप्टेंबरला भारताचा इंग्लंड दौरा संपणार आहे. त्यानंतर भारत आशिया कपसाठी युएईला जाईल. १५ सप्टेंबरपासून आशिया कपला सुरुवात होत आहे. पण भारताचा पहिला सामना १८ सप्टेंबरला आहे. भारत आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचला तर २८ सप्टेंबरला मॅच खेळायला लागेल. म्हणजेच आशिया कप ते वेस्ट इंडिजविरुद्धची पहिली टेस्ट यामध्ये भारतीय टीमला सरावाला फक्त ५ दिवस मिळणार आहेत.


वेस्ट इंडिजची टेस्ट टीम


जेसन होल्डर (कर्णधार), सुनिल एम्ब्रिस, देवेंद्र बिशू, क्रेग ब्रॅथवेट, रोस्टन चेज, शेन डारिच, शेनॉन गॅब्रियल, जहमर हॅमिल्टन, शिमरोन हेतमेयर, शाय होप, अलजारी जोसेफ, कीमो पॉल, कीरन पॉवेल, केमार रोच, जोमेल वारिकन


टेस्ट सीरिजचं वेळापत्रक


पहिली टेस्ट : ४-८ ऑक्टोबर- राजकोट


दुसरी टेस्ट- १२-१६ ऑक्टोबर- हैदराबाद


वनडे सीरिजचं वेळापत्रक


पहिली वनडे- २१ ऑक्टोबर- गुवाहाटी


दुसरी वनडे- २४ ऑक्टोबर- इंदूर


तिसरी वनडे- २७ ऑक्टोबर- पुणे


चौथी वनडे- २९ ऑक्टोबर- मुंबई


पाचवी वनडे- १ नोव्हेंबर- तिरुअनंतपुरम


टी-२० सीरिजचं वेळापत्रक


पहिली टी-२०- ४ नोव्हेंबर- कोलकाता


दुसरी टी-२०- ६ नोव्हेंबर- कानपूर किंवा लखनऊ


तिसरी टी-२०- ११ नोव्हेंबर- चेन्नई