India Vs West indies: सध्या सुरू असलेल्या भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI 3rd ODI) यांच्यातील वनडे मालिकेचा अखेरचा सामना आज खेळवला जाणार आहे. अशातच आता वेस्ट इंडिजने आगामी टी-ट्वेंटी मालिकेसाठी दोन बड्या खेळाडूंची अचानक संघात एन्ट्री केलीये. वेस्ट इंडीजने अनुभवी विकेटकिपर फलंदाज शाई होप (Shai Hope) आणि वेगवान गोलंदाज ओशाने थॉमस (Oshane Thomas) यांना 5 सामन्यांच्या T20 मालिकेसाठी त्यांच्या संघात परत बोलावले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाई होप गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून कॅरेबियन संघासाठी एकही टी-20 खेळलेला नाही, तर थॉमस डिसेंबर 2021 पासून त्याच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी मालिकेसाठी उतरणार आहे. जेसन होल्डर, निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर आणि उपकर्णधार काइल मेयर्स यांच्यासारखे खेळाडू संधी देण्यात आल्याने आता वेस्ट इंडिजचा संघ टीम इंडियाला कडवी टक्कर देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आता रोहित विराटला कसून तयारी करावी लागणार आहे.


पुढील आयसीसी पुरुष T20 विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून संघाची निवड करण्यात आल्याची माहिती मुख्य निवडकर्ता आणि वेस्ट इंडिजचे महान खेळाडू डेसमंड हेन्स यांनी दिलीये. वेस्ट इंडिज भारतात यंदाच्या वनडे वर्ल्ड कपसाठी पात्र ठरू शकला नसला तरी, ही मालिका त्यांना पुढील वर्षी होणाऱ्या टी-ट्वेंटी स्पर्धेसाठी फायदेशीर ठरेल, असं मत त्यांनी व्यक्त केलंय.



कसा असेल संघ?


वेस्ट इंडिजचा T20I संघ: रोव्हमन पॉवेल (c), काइल मेयर्स (vc), जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकेल होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, ओबेद मॅककॉय, निकोलस पूरन, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, ओशाने थॉमस.


भारताचा T20I संघ: इशान किशन, शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, टिळक वर्मा, सूर्य कुमार यादव (VC), संजू सॅमसन, हार्दिक पांड्या (C), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार.


आणखी वाचा - शेवटच्या सामन्यात इंग्लंडने केली ऑस्ट्रेलियाच्या स्वप्नाची 'राख'; स्टुअर्ट ब्रॉडचा शेवट गोड!


टी-ट्वेंटी मालिकेचं वेळापत्रक: (WI vs IND Time Table)


3 ऑगस्ट: पहिला T20I, ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, त्रिनिदाद
6 ऑगस्ट: दुसरा T20I, नॅशनल स्टेडियम, गयाना
8 ऑगस्ट: तिसरा T20I, नॅशनल स्टेडियम गयाना
12 ऑगस्ट: चौथा T20I, ब्रॉवर्ड काउंटी स्टेडियम, लॉडरहिल, फ्लोरिडा
13 ऑगस्ट: 5वी T20I, ब्रॉवर्ड काउंटी स्टेडियम, लॉडरहिल, फ्लोरिडा