ICC World Cup Qualifiers 2023: झिम्बॉबे येथे सुरु असलेल्या क्वालिफायर स्पर्धेत मोठा उलटफेर झाल्याचं पहायला मिळतंय. तब्बल 2 वेळा विश्वचषक उंचावणाऱ्या तगड्या वेस्ट इंडिजचा लिंबूटिंबू स्कॉटलँडने (Scotland vs West Indies) पराभव केला आहे. लाजीरवाण्या पराभवानंतर आता वेस्ट इंडिजचं वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. महत्त्वाच्या सामन्यात स्कॉटलँडने वेस्ट इंडिजचा 7 गडी राखून पराभव केला. त्यामुळे आता वर्ल्ड कपच्या (World Cup 2023) इतिहासात पहिल्यांदाच वेस्ट इंडिजचा संघ समाविष्ट नसेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरारे स्पोर्स्ट कल्ब मैदानात (Harare Sports Club) खेळलेल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीज संघाने 181 धावांपर्यंतच मजल मारली होती. जेसन होल्डर वळगता इतर कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही.  होल्डरने 79 चेंडूत 45 धावा केल्या. तर रोमॅरियो शेफर्ड याने 43 बॉलमध्ये 36 धावांची साथ दिली. त्याशिवाय इतर कोणत्याही खेळाडूला मैदानात टिकता आलं नाही. कॅप्टन शाई होप देखील स्वस्तात बाद झाला. संपूर्ण संघाता 50 ओव्हर देखील खेळता आल्या नाहीत.



वेस्ट इंडिजने दिलेल्या 182 धावांचा स्कॉटलँडने यशस्वी पाठलाग केला. स्कटलँडने सात विकेट आणि 39 बॉल राखून स्कॉटलँडने 182 धावांच्या आव्हानाचा पाठलाग केला. ब्रँडन मॅकमुलेन याने 69 धावा तर मॅथ्यू क्रॉसने 74 धावांची मोलाची खेळी केली. दोघांच्या 125 धावांच्या भागेदारीमुळे वेस्ट इंडिजला पराभवाला समोरं जावं लागलंय. त्यामुळे आता पात्रता फेरीतच वेस्ट इंडिजचं आव्हान संपुष्टात आलंय.


आणखी वाचा - पाकिस्तानच्या शाहीन अफ्रिदीने रचला इतिहास; एकाच ओव्हरमध्ये केला 'हा' कारनामा; पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्ड बनवलाय!


दरम्यान, वेस्ट इंडिजने 1975 आणि 1979 या दोन एकदिवसीय विश्वचषकावर नाव कोरलं होतं. एकेकाळी क्रिकेट विश्वावर अधिराज्य गाजवणारा वेस्ट इंडिज (World Champion West Indies) संघ यंदा वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसणार नाही. त्यामुळे आता वेस्ट इंडिजच्या भविष्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे.


वेस्ट इंडिजची टीम


ब्रँडन किंग, जॉन्सन चार्ल्स, शमारह ब्रूक्स, शाई होप (C), निकोलस पूरन, काइल मेयर्स, केविन सिंक्लेअर, जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, अकेल होसेन, अल्झारी जोसेफ


स्कॉटलँडची टीम


मॅथ्यू क्रॉस, ख्रिस्तोफर मॅकब्राइड, ब्रँडन मॅकमुलेन, जॉर्ज मुन्से, रिची बेरिंग्टन (C), टॉमस मॅकिन्टोश, मायकेल लीस्क, ख्रिस ग्रीव्हज, मार्क वॅट, सफियान शरीफ, ख्रिस सोल