वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी ३११ धावांचे आव्हान
भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी ३११ धावांचे आव्हान आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना ४३ षटकांत ५ बाद ३१० धावा केल्यात.
पोर्ट ऑफ स्पेन : भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी ३११ धावांचे आव्हान आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना ४३ षटकांत ५ बाद ३१० धावा केल्यात.
सामन्याच्या सुरुवातीला पावसाचा व्यत्यय राहिल्याने सामना ४३ षटकांचा खेळवण्यात येतोय. भारताच्या सलामीवीरांनी सुरुवात दमदार केली. भारताचे सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि शिखर धवनने ११४ धावांची दमदार सलामी दिली. शिखर धवन ६३ धावांवर बाद झाला.
त्यानंतर अजिंक्य रहाणे शानदार शतक झळकावले. रहाणेने १०४ चेंडूत १०३ धावा केल्या. यात १० चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. त्याचे हे वनडेतील दुसरे शतक आहे.
कर्णधार विराट कोहलीने ८७ धावा तडकावल्या. जोसेफच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात कोहली बाद झाला. धोनी १३ धावांवर नाबाद राहिला. तर युवराज पुन्हा एकदा या सामन्यात अपयशी ठरला. त्याने १४ धावा केल्या.